ETV Bharat / state

संगमनेरच्या घारगाव येथे चोरट्यांचा धुमाकुळ, परिसरात भीतीचे वातावरण - Ahmednagar breaking news

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बुधवारी (दि. 14 एप्रिल) पहाटे अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Apr 14, 2021, 4:44 PM IST

Updated : Apr 14, 2021, 4:56 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे बुधवारी (दि. 14 एप्रिल) पहाटे अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनास्थळ
चोरट्यांनी उचकटलेले कपाट

याबाबतची अधिक माहिती अशी की, घारगाव येथील महंमद गफूर शेख यांचे शेतात घर आहे. बुधवारी पहाटे चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाट उचकटून कपाटातील सर्व साहित्य खाली फेकून दिले. यावेळी चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून पोबारा केला. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा गावातील माधव पुंजाहारी धात्रक यांच्या घराकडे वळवला. धात्रक यांच्याही घराची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि कपाट उचकटून आतमधील सर्व साहित्य खाली फेकून दिले. घरातील पत्र्याची पेटीही उचकटून बाहेर फेकली. त्यानंतर समोरच विठाबाई पुंजाहारी धात्रक या झोपलेल्या होत्या. त्यांच्याही गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडले. त्यावेळी विठाबाई झोपेतून जाग्या झाल्या आणि त्यांची चोरट्यांशी झटापट झाली. त्यावेळी त्यांच्या हाताला ओरखडले असून चोरट्यांनी त्यांना ढकलून देऊन धूम ठोकली.

या घटनांची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांच्या दहशतीमुळे घारगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या चोरट्यांचा शोध लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा - साई मंदिरात भक्तांविना गुढीपाडवा.. कोरोनाचे संकट दूर होण्याची प्रार्थना

Last Updated : Apr 14, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.