ETV Bharat / state

नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यासोबत राज्यपालांनी केली चर्चा, अडचणी सोडविण्याचे दिले आश्वासन - governor of Maharashtra news

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी खैरी निमगाव येथील एका शेतकऱ्यांना मेलद्वारे भेटण्यासाठी वेळ मागितली होती. राज्यपालांनी त्या शेतकऱ्याला वेळ दिली. त्यानंतर शेतकरी व राज्यपाल यांच्या 40 मिनिटे चर्चा झाली.

राज्यपालांची भेट घेताना शेतकरी
राज्यपालांची भेट घेताना शेतकरी
author img

By

Published : Oct 5, 2020, 7:54 PM IST

अहमदनगर - शेतकऱ्यांच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नव्या-जुन्या अडचणींच्या संदर्भात भेटीबाबत खैरी निमगाव येथील संतोष भागडे या शेतकऱ्याने मेलवरुन राज्यपालांना भेटण्यासाठी विनंती केली होती. याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना भेटीसाठी राजभवनात बोलावून 40 मिनिटे चर्चा करत कृषी विषयक समस्या समजावून घेत त्याबाबत राज्य आणि केंद्र सरकारकडे योग्य ती शिफारस करण्याचे आश्वासन दिले आहे.

बोलताना शेतकरी संतोष भागडे
शेतमालाला हमीभाव, निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना कर्जमाफी, विजेचे कोलमडलेले वेळापत्रक, निकृष्ठ बियाणे आणि रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पीक विम्याची प्रभावीपणे होत नसलेली अंमलबजावणी, दुधाला मिळत नसलेला रास्त भाव, कोरोनामुळे शेतकऱ्यांची झालेली आर्थिक हानी आदी प्रश्नांबाबत भागडे यांनी शासकीय पातळीवर तळमळीने पाठपुरावा केला होता. पण, त्यांच्या प्रयत्नाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे थेट राज्यपालांना भेटून त्यांच्यामार्फत शेतीच्या या प्रलंबित समस्या सोडविण्याचा विचार भागडे यांच्या मनात आला. त्या इच्छेपोटी त्यांनी राजभवनात मेलद्वारे राज्यपालांना भेटण्यासाठी विनंती केली होती. त्याची दखल घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेटीसाठी वेळ दिली होती. ग्रामीण भागातील एका सामान्य तरुण शेतकऱ्याला राज्यपालांनी भेटीसाठी वेळ देऊन सर्व प्रश्न नीट समजवून घेत सुमारे 40 मिनिटे राजभवनात चर्चा केली. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखविल्याने भागडे यांच्यासह उपस्थित शेतकरी भारावून गेले.

हेही वाचा - महावितरणचा झटका..! लॉकडाऊन काळात हॉटेल बंद, तरीही सहा महिन्यात चार लाखांचे लाईट बिल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.