अहमदनगर - राहाता तालुक्यातील नेहमीच दुष्काळी समजल्या जाणाऱ्या केलवड गावातील सुभाष वाघे या शेतकऱ्याने आपल्या पावणे दोन एकर डाळींब बागेवर जेसीबी फिरवली आहे. अपुऱ्या पाण्याअभावी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
वाघे या शेतकऱ्याने २०१३ साली या डाळींब बागेची लागण केली होती, चालू वर्षी पाऊस न झाल्यामुळे ६० हजार रु खर्चून टँकरने पाणी टाकून बाग जगवली, परंतु आता पाणी टाकण्याची ऐपत नसल्यामुळे बाग संपूर्णपणे सुकली आहे, त्यामुळे बागेतील एक ना एक झाड त्यांनी जेसीबीने जमीनदोस्त केलं आहे. त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणी प्रमाणे तलाठ्याच्या गलथान कारभारामुळे या बागेवर सुभाष वाघे यांना सरकारी मदतही मिळाली नाही. डाळींब बाग असताना तलाठ्याने त्याची सोषाबणी म्हणून नोंद केल्याचे वाघे यांचे म्हणणे आहे.