ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या 'व्हीसी'मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी मांडले कोरोना हिवरेबाजारचे आदर्श 'मॉडेल' - Hivare bajar news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) देशातील 56 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, नाविन्यपूर्ण संकल्पना, औषध, ऑक्सिजन आदींबाबत माहिती घेतली व सूचना केल्या. महाराष्ट्रातील सतरा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाले होते. त्यात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले हे सहभागी होते. त्यांनी पंतप्रधानांना या बैठकीदरम्यान जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : May 20, 2021, 3:10 PM IST

अहमदनगर- अवघ्या महिनाभरात कोरोनामुक्तीचा यशस्वी पॅटर्न राबवणाऱ्या आदर्शगाव हिवरेबाजारचे उदाहरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर मांडत जिल्हा कोरोनामुक्तीचा पॅटर्न जिल्हाभर राबवत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. पंतप्रधानांनी आज देशातील 56 जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव, प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, नाविन्यपूर्ण संकल्पना, औषध, ऑक्सिजन आदींबाबत माहिती घेतली व सूचना केल्या. त्या बैठकीत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी ही माहिती पंतप्रधानांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवेळी बोलताना

जिल्ह्यात राबवत आहे हिवरेबाजार पॅटर्न

हिवरेबाजारमध्ये एप्रिल महिन्यात पन्नासवर कोरोना रुग्ण आढळले. या दरम्यान हिवरेबाजारचे आदर्शसरपंच पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाची तपासणी करून बधितांना विलगिकरणात ठेवण्यात आले. मुख्य म्हणजे त्यांच्या शेताची, दूध संकलनाची कामे स्वयंसेवकांनी केली. त्यामुळे बाधित वाढले नाहीत आणि गाव पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याची माहिती पंतप्रधानांना देण्यात आली. हिवरेबाजारचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न इतर गांवांना समजावून सांगितला असून त्यानुसार काम सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

ऑक्सिजन सुरळीत, मृत्यूदरही घटला

तीन रिफिलिंग सेंटरवरून दोनशे रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केला गेला. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या अवघ्या अडीच महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पहिल्या लाटेपेक्षा मृत्यू दर हा कमी असल्याची आकडेवारी पंतप्रधानांना देण्यात आली. महाराष्ट्रातील 17 जिल्हाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी झाली होते.

हेही वाचा - अहमदनगरमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या 81वर, आतापर्यंत तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.