अहमदनगर - जिल्ह्यातील पाथर्डी येथे ज्या मुलाने शेतकरी आत्महत्येवर कविता सादर केली त्याच मुलाच्या वडिलाने आत्महत्येची घटना घडल्यानंतर सारेच हेलावले होते. हे सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमुक्ती करू असे म्हणत असले तरी मात्र शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
हेही वाचा - 'मी स्वीकारलेला रस्ता योग्यच, रस्ता बदलण्याची गरज नाही'
कर्जमाफी योजनेची स्पष्टता सरकारने करणे गरजेच आहे. नेमकी किती कर्जमाफी होणार आहे या चिंतेत सर्व आहेत. मात्र, सरकार टिकविण्याची चिंता या तीन्ही पक्षांना चिता आहे शेतकरी चिंता मुक्त कसा होईल याच्याशी सरकारल काही देणे घेणे नसल्याचे विखे पाटील म्हणाले.
राज्यात वाळू माफीयांनी धुडगूस घातला आहे. सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत. मात्र, महसुल मंत्री चुप्पी साधून आहेत. स्वत:च्या तालुक्यात वाळु माफीया तयार केले आहेत. आपल्या बच्यांना पाठीशी घालण्याचे काम मंत्री थोरात करत असल्याचे विखे म्हणाले. तसेच वाळू माफीयांविरोधात मोक्का अंकर्गत कारवाई करण्याची मागणी विखेंनी केली आहे.
शिवसेना आपल्या मुलभूत धोरणांना विसरली -
"आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी बांग्लादेशी घुसखोरांना हाकल्याणी मागणी केली होती. ते आता हयात असते तर त्यांनी भूमिका जाहीर केली असती. परंतु, सत्ता टिकविण्याच्या नादात आपल्या मुलभूत धोरणांला बगल देण्याचे काम शिवसेना करत आहे." असे विखे पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा - शिर्डीत ५ महिन्यांच्या मुलीची चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद