अहमदनगर: अहमदनगर शहरातील आशा टॉकीज परिसरातील अरीशा कलेक्शन या दुकानातून पोलिसांनी तलवारी, गुप्ती आणि चाकू अशी 21 हत्यारे जप्त ( Sword Gupti knife seized) केले आहेत. शहरातील आशा टॉकीज चौकात अरीशा कलेक्शन या दुकानात तलवारी विकत ( Arisha Collection Arms Sale Ahmednagar) असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळली होती. त्यानुसार पोलीस स्टेशनचे पीएसआय कचरे पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, संदीप थोरात, इनामदार,सुजय हिवाळे, अमोल गाडे, महिला पोलीस कर्मचारी इनामी बागवान यांच्या पथकाने संबंधित दुकानावर जाऊन छापा (Police raid shop) टाकला असता या ठिकाणी तलवारी, गुप्ती, तसेच चाकू आढळून आले आहेत. (Weapons Seized From Shop Ahmednagar)
अवैध घातक शस्त्र आणि हुक्का पार्लरचे साहित्य: नगर शहरातील आशा टॉकीज चौक हा मोठ्या रहदारीचा चौक असून जिल्ह्यातून नगर शहरात खरेदीस येणाऱ्या नागरिकांना येथूनच विविध भागात खरेदीसाठी जावे लागते. अशा वर्दळीच्या ठिकाणी रोडवरच असलेल्या दुकानात ही जीवघेणी शस्त्रे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तसेच छाप्यात या दुकानातून हुक्का पार्लरसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या साहित्यांचा साठा कशासाठी करण्यात आलेला होता याबाबत चौकशी सुरू आहे. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अरीशा कलेक्शनचे मालक हुमायू शेख याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
यांनी घेतला कारवाईत सहभाग: ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे पीएसआय कचरे पोलीस कर्मचारी योगेश भिंगारदिवे, योगेश खामकर, संदीप थोरात, इनामदार,सुजय हिवाळे ,अमोल गाडे, महिला पोलीस कर्मचारी इनामी बागवान यांच्या पथकाने केली.