ETV Bharat / state

तिकीट नाकारल्याने दिलीप गांधी अपक्ष लढणार?; रविवारी समर्थकांच्या मेळाव्यात निर्णय

दिलीप गांधी याच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी गाधींनी समर्थकांशी चर्चा केली.

author img

By

Published : Mar 22, 2019, 8:58 PM IST

Updated : Mar 22, 2019, 9:27 PM IST

दिलीप गांधी याच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठक झाली.

अहमदनगर- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी नाकारत डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिल्याने गांधी समर्थक नाराज झाले आहेत. गांधी यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, यासाठी कार्यकर्ते आग्रही असून त्यासाठी येत्या रविवारी समर्थकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात खासदार गांधी यांनी ही निवडणूक अपक्ष लढवावी, असा आग्रह केला जाणार आहे.

दिलीप गाधींनी समर्थकांशी चर्चा केली.

स्वतः गांधी यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नसून गुरुवारी रात्री तिकीट नाकारल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते पुन्हा दिल्लीला गेल्याचे त्यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी सांगितले. सुवेंद्र यांनीही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असला तरी कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून गांधी मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून योग्य तो निर्णय घेतील, असे म्हटले जात आहे. मेळावा हा कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. दिलीप गांधी याच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी गाधींनी समर्थकांशी चर्चा केली.

तीनवेळा खासदार असलेल्या गांधींवर पक्षाने अन्याय केला; कार्यकर्त्यांची भावना

खासदार दिलीप गांधी हे तीन वेळेस मोठ्या मताधिक्याने आघाडीच्या उमेदवाराला हरवत निवडून आले. असे असताना ज्या उमेदवाराचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही. त्याला पक्षाने उमेदवारी देत स्थानिक कार्यकर्त्यांचा अपमान केल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. खासदार गांधींच्या मतदारसंघातील कामे आणि संसदेतील घेतलेल्या कामकाजातील सहभागामुळे त्यांना उत्कृष्ठ संसदपटूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे, असे असताना त्यांना उमेदवारी नाकारल्याची खंत समर्थक व्यक्त करत आहेत.

Intro:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
सर, वरील slag ने मोजो वरून खा.दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्या बाबत कार्यकर्त्याच्या भावना आणि रविवारी मेळाव्यात अपक्ष निवडणूक लढवण्याबत आग्रह, याविषयावर बातमी पाठवली आहे. स्क्रिप्ट आणि बाईट, विजवल त्यात आहेत, या बातमी साठी काल रात्री खा.गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे विजवल या वेब मोजो आर्टिकल ला जोडलेले आहेत, कृपया वापरावेत..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
सर, वरील slag ने मोजो वरून खा.दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्या बाबत कार्यकर्त्याच्या भावना आणि रविवारी मेळाव्यात अपक्ष निवडणूक लढवण्याबत आग्रह, याविषयावर बातमी पाठवली आहे. स्क्रिप्ट आणि बाईट, विजवल त्यात आहेत, या बातमी साठी काल रात्री खा.गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे विजवल या वेब मोजो आर्टिकल ला जोडलेले आहेत, कृपया वापरावेत..Conclusion:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
सर, वरील slag ने मोजो वरून खा.दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्या बाबत कार्यकर्त्याच्या भावना आणि रविवारी मेळाव्यात अपक्ष निवडणूक लढवण्याबत आग्रह, याविषयावर बातमी पाठवली आहे. स्क्रिप्ट आणि बाईट, विजवल त्यात आहेत, या बातमी साठी काल रात्री खा.गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे विजवल या वेब मोजो आर्टिकल ला जोडलेले आहेत, कृपया वापरावेत..
Last Updated : Mar 22, 2019, 9:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.