ETV Bharat / state

डॉ. सुजय विखेंचे नगरमध्ये जोरदार स्वागत, भाजप सेनेच्या नेत्यांची घेणार भेट - SENA

डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच प्रथमच शहरात आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

डॉ. सुजय विखे
author img

By

Published : Mar 14, 2019, 9:04 PM IST

अहमदनगर - डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच प्रथमच शहरात आगमन झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगर दक्षिणच्या जागेची निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची समजली जात आहे.

सुजय विखेंचे नगरमध्ये जोरदार स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला न सोडल्याने नाराज होत सुजय विखेंनी भाजपमध्ये प्रवेश करत आघाडीला धक्का दिला. आता ही निवडणूक आघाडी विरुद्ध भाजप न राहता शरद पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे अशी होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत.

स्वागतासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. याबद्दल सुजय विखेंनी समाधान व्यक्त केले. यावेळी विखे म्हणाले, की मी या पक्षात नवीन असलो तरी माझे अनेक जवळचे मित्र या पक्षात आहेत. त्याचबरोबर मी गेल्या ३ वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन कामे केली आहेत. त्यामुळे या मतदारसंघात माझा विजय हा फक्त औपचारिक बाब असल्याचे ते म्हणाले.

विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट नाकारले जाणार असल्याने गांधीसह अनेक पदाधिकारी नाराज आहेत. याबद्दल सुजय विखेंना विचारले असता ते म्हणाले, की मी भाजपमध्ये प्रवेश करत युतीमध्ये दाखल झालेलो आहे. त्यामुळे खासदार दिलीप गांधीसह भाजपाचे सर्व ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड या सर्व नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच जे नाराज आहेत त्यांची समजूत काढून मदतीचे आवाहन करणार असल्याचेही विखे म्हणाले.

Intro:अहमदनगर- डॉ. सुजय विखे यांचं नगर शहरात जोरदार स्वागत.. भाजप-सेनेच्या नेत्यांची भेट घेऊन समजूत काढणार.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

Slug-
mh_ahm_trimukhe_1_sujay_vikhe_welcome_14_march_b
mh_ahm_trimukhe_2_sujay_vikhe_welcome_14_march_v
mh_ahm_trimukhe_3_sujay_vikhe_welcome_14_march_v
mh_ahm_trimukhe_4_sujay_vikhe_welcome_14_march_v
mh_ahm_trimukhe_5_sujay_vikhe_welcome_14_march_v
mh_ahm_trimukhe_6_sujay_vikhe_welcome_14_march_v

अहमदनगर- डॉ. सुजय विखे यांचं नगर शहरात जोरदार स्वागत.. भाजप-सेनेच्या नेत्यांची भेट घेऊन समजूत काढणार..

अहमदनगर- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात उमेदवारी वरून लक्षवेधी ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सुजय विखे यांचे आपल्या भाजप पक्षपप्रवेशा नंतर शहरात आगमन होताच जोरदार स्वागत करण्यात आले. आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेसने ही जागा काँग्रेसला न सोडल्याने नाराज होत सुजय यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आघाडीला धक्का दिलाय. एक प्रकारे आता ही निवडणूक आघाडी विरुद्ध भाजप न राहता शरद पवार विरुद्ध राधाकृष्ण विखे या पद्धतीने राज्यभर चर्चेत राहणार असून या पार्श्वभूमीवर नगर मध्ये भाजप प्रवेशानंतर नगर मध्ये प्रथमच दाखल झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांचे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. यावेळी बोलताना सुजय विखे यांनी माझ्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मी या पक्षात नवीन असलो तरी माझे अनेक मित्र या पक्षांमध्ये जवळचे आहेत. त्याचबरोबर मी गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेत केलेल्या कामे यामुळे या मतदारसंघात माझा विजय हा फक्त औपचारिक बाब असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे तिकीट नाकारले जाणार असल्याने गांधी सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याबद्दल सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी भाजप मध्ये प्रवेश करत युती मध्ये दाखल झालेलो आहे. त्यामुळे खासदार दिलीप गांधी किंवा भाजपाचे इतरही सर्व ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांची वेळ घेऊन भेट घेणार आहे, तसेच ज्यांची नाराजी असेल त्यांची समजूत काढणार असून मदतीचं आवाहन करणार आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- डॉ. सुजय विखे यांचं नगर शहरात जोरदार स्वागत.. भाजप-सेनेच्या नेत्यांची भेट घेऊन समजूत काढणार..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.