ETV Bharat / state

आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाच्या मदतीने पहिल्या पुंगनुर वासरास जन्म घालण्यात यश - I. V. F. Technology

आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाच्या ( I. V. F. Of technology ) मदतीने पहिल्या पुंगनुर जातीच्या सुद्रुढ वासरास जन्म देण्यास यश आले आहे. त्यामुळे आता दुर्मिळ होत असलेल्या देशी गोवंशांची पैदास वाढवण्यास मदत होणार आहे.

पुंगनुर जातीचे सुद्रुढ वासरु
पुंगनुर जातीचे सुद्रुढ वासरु
author img

By

Published : Jan 10, 2022, 3:23 PM IST

Updated : Jan 10, 2022, 5:40 PM IST

अहमदनगर : आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाच्या मदतीने पहिल्या पुंगनुर जातीच्या सुद्रुढ नर वासरास जन्म ( male calf of Punganur breed ) देण्यास यश आले आहे. आंध्र प्रदेशातील बुटकी गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुंगनुर जातीच्या बैलाचे सिमेन्स आणि त्याच जातीच्या राजकोट येथील गाईचे अंडकोष काढून त्याचे फर्टीलायझेशन करण्यात आले. हे फर्टीलायझेशन पुणे जिल्ह्यातल्या शिरुर येथील जेके ट्रस्टच्या प्रयोग शाळेत ( Laboratories of JK Trust at Shirur ) करण्यात आले. त्यानंतर तो सात दिवसांचा झालेला गर्भ संगमनेर येथील शेतकरी दादाहरी गिते यांच्या होस्टन गाईच्या गर्भपिशवीत टाकण्यात आला. तसेच याचे काटेकोर नियोजन करुन दहा महीन्यात पहील्या पुंगनुर जातीच्या सुद्रुढ वासरास जन्म दिला आहे.

आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाच्या मदतीने पहिल्या पुंगनुर वासरास जन्म
सध्या देशी गोवंशला मोठं महत्व प्राप्त झाले आहे. त्यात देशी गोवंशांची संख्या कमी आहे. देशी गोवंश तिच्या आयुष्यात फक्त सात ते आठ वासरांना जन्म देवु शकते. मात्र आय. व्ही. एफ. तंत्रज्ञानाच्या ( I. V. F. Technology ) मदतीने शंभरच्या वर पैदास होऊ शकते. दुसरीकडे सध्या शेतकऱ्याकडे कडे होस्टन गाईची संख्या मोठी आहे. मात्र त्यांची गर्भधारणा लवकर होत नाही. तसेच गाय गाभन करण्यास खर्च ही होतो. मात्र भारतीय गोवंश वाढविण्याच्या योजनेत शेतकऱ्यांना ट्रस्ट मार्फत दहा हजाराची मदत केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतोय. पुंगनुरु गाय ( Punganuru cow milk ) दिवसाला 3 ते 5 लिटर दूध देते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सामान्य गायीच्या दूधात फॅट 3 ते 4 टक्के असते. परंतु पुंगनुर गायीच्या दुधात 8 टक्क्यां पर्यंत फॅट आढळते. त्यामुळे आता पुंगनुर बरोबरीनेच देशी गोवंशी वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

Last Updated : Jan 10, 2022, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.