ETV Bharat / state

4 kg Gold Donate To Sai baba Temple : दाक्षिणात्य भाविकाने साई चरणी केले 2 कोटींचे सोने दान - शिर्डी साई बाबा मंदिर सोने दान

दक्षिणेतील भाविकाने तब्बल चार किलो वजन असलेल्या सोन्याची पट्टी दान ( Donate 4 kg gold bar weighing at Sai baba Temple ) केली असून तीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे. साईबाबांच्या मूर्तीला (Shree sai baba temple shirdi ) सन 2008 साली तब्बल 110 किलोच्या सोन्यापासून बनविले सिंहासन बसविले गेले होते.

Gold Donate
Gold Donate
author img

By

Published : May 17, 2022, 8:46 PM IST

Updated : May 17, 2022, 8:57 PM IST

शिर्डी - साईबाबांच्या मूर्तीला सुवर्ण सिंहासन बसविण्यात आले, मात्र साई मूर्तीच्या चौथऱ्याला ( संगमरवरावर ) सुवर्ण अच्छादन नव्हते. आता दक्षिणेतील भाविकाने तब्बल चार किलो वजन असलेल्या सोन्याची पट्टी दान ( Donate 4 kg gold bar weighing at Sai baba Temple ) केली असून तीची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी आहे. साईबाबांच्या मूर्तीला ( Shree sai baba temple shirdi ) सन 2008 साली तब्बल 110 किलोच्या सोन्यापासून बनविले सिंहासन बसविले गेले होते. त्यासाठी आंध्र प्रदेशातील साईभक्त आदिनारायण रेड्डी यांनी हे सोने दान केले होते.

प्रतिक्रिया देताना मुख्याधिकारी

साईच्या मूर्तीला सुवर्ण सिंहासन बसविण्यात आले मात्र मूर्तीच्या चौथऱ्याला सुवर्णाने मढविण्याचे राहील होते. त्यासाठीची पट्टी देण्याची ईच्छा साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी सन 2016 मध्येच व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर कोविड प्रकोप सुरु झाल्यामुळे ही पट्टी बसविता आली नव्हती. आता कोविडचे नियम उठल्याने आणि सर्व पूर्वपदावर आल्याने साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी चार किलो सोन्यापासून अत्यंत सुबक आणि आकर्षक हत्ती, मोर आणि फुलांचे असे पौराणिक नक्षीकाम केलेली असलेली ही पट्टी साईंच्या मूर्ती चौथऱ्याला बसवली आहे. सुवर्ण सिंहासनानंतर साईचरणी आलेले हे सोन्याचे मोठ आणि महत्वाचे दान मानल जात आहे.

हेही वाचा - Farah Khan in Shirdi : साई बाबांकडे काय मागितले? फराह खानने मिश्किल उत्तर देत म्हटले, मी बाबांकडे...

Last Updated : May 17, 2022, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.