शिर्डी - साईबाबा संस्थानच्या नूतन विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या नेमणुकीवेळी घालुन दिलेल्या नियमांच पालन केले नसल्याचा आरोप कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे. तसेच या विश्वस्त मंडळाच्या निवडी विरोधात न्यायालत आवाहन देणार असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले आहे.
साईबाबा संस्थानाचे विश्वस्त नेमतांना 17 सदस्यांची नेमणूक करायची आहे. त्यात एक महिला सदस्य, एक सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्ती असावी, तर किमान आठ सदस्य हे उच्च विद्या विभुषीत आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत. मात्र यावेळी झालेल्या विश्वस्तांच्या नेमणुकीमध्ये या नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे साई संस्थानच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाखल खटल्याचा कामकाजात ही बाब न्यायालयाच्या निर्देशनास आणुन दिली जाणार आहे. या माध्यामातून सरकारने विश्वस्त निवडीचे नियम पाळावेत, अशी मागणी केली संजय काळ यांनी केली आहे.
हेही वाचा - साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदावरून काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू
हेही वाचा - मुख्यमंत्री महोदय.. साई मंदिर उघडण्यासाठी अंत पाहु नका; अन्यथा आंदोलन करू- भाजपा