ETV Bharat / state

साई संस्थानच्या सदस्यांची बदनामी केल्याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक - Sai Sansthan

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साई मंदीर पहाणी करत असतानाचे फोटो आणि सी सी टीव्ही फुटेज समाज माध्यमावर व्हारल केले. या प्रकारामुळे अध्यक्ष आणि समीतीच्या सदस्यांची बदनामी झाली असे सांगत येथील प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

साई संस्थानच्या सदस्यांची बदनामी केल्याप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना अटक

author img

By

Published : Sep 22, 2021, 10:54 AM IST

अहमदनगर (शिर्डी) - साईबाबा संस्थानचे अध्यक्ष असलेले जिल्हा मुख्य न्यायाधीश यांचे साई मंदीर पहाणी करत असतानाचे फोटो आणि सी सी टीव्ही फुटेज समाज माध्यमावर व्हारल केले. या प्रकारामुळे अध्यक्ष आणि समीतीच्या सदस्यांची बदनामी झाली असे सांगत येथील प्रशासकीय अधिकाऱ्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

मंदीरातील फोटो व सीसीटिव्ही फुटेजही वापरण्यात आले

गेल्या 31 जुलै रोजी साईसंस्थान व्यवस्थापनाच्या बैठकीनंतर जिल्हा प्रधान न्यायाधीश व तदर्थ समितीच्या सदस्या असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांनी कोविडच्या पार्श्वभूमीवर साई मंदिराची पहाणी केली होती़. एका युट्युब चॅनलने मात्र अध्यक्ष व समितीच्या सदस्यांनी कोविड नियमांचा भंग केल्याची व मंदीर बंद असतांनाही दर्शन कसे घेतले अशी बातमी प्रसिद्ध केली होती़. यात मंदीरातील फोटो व सीसीटिव्ही फुटेजही वापरण्यात आले होते़. यामुळे भाविकांनामध्ये गैरसमज पसरला व बदनामी झाल्या प्रकरणी अध्यक्षांनी संस्थानच्या सुरक्षा प्रमुखांना चौकशीचे आदेश दिले होते़.

हार्डडिक्समधील फोटो डिलीट करण्यात आले

संबधितांनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य केले असून यामुळे मंदिर सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. हे सर्व करत असतांना हार्डडिक्समधील फोटो डिलीट करण्यात आले व संगणकातील फोटे घेवून त्यात छेडछाड केल्याच्या गंभीर मुद्द्यावर आज सायंकाळी साई मंदीर सुरक्षा प्रमुख हर्षवर्धन गवळी यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभाग प्रमुख विनोद कोते, पत्रकार राहुल फुंदे, संस्थान कर्मचारी पतपेढीचे कर्मचारी अजित जगताप, सचिन गव्हाणे व कर्मचारी चेतक साबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहेत़.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.