ETV Bharat / state

"नगरसेवकपद रद्द केल्याचा आदेश मिळाला, अपिलात जाण्याबद्दल अद्याप निर्णय नाही" - नगरसेवक श्रीपाद छिंदम

भाजपतर्फे उपमहापौर असताना श्रीपाद छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणाची दखल आता ठाकरे सरकारने त्याच्यावर कारवाई केली आहे.

shripad chhindam
श्रीपाद छिंदम
author img

By

Published : Feb 28, 2020, 6:18 PM IST

अहमदनगर - छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह संभाषण केल्याबद्दल अहमदनगर महापालिकेचा वादग्रस्त अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद नगरविकास विभागाने रद्द केले आहे. याबद्दल प्रतिक्रिया देताना या निर्णयाची प्रत मिळाल्याचे छिंदमने सांगताना अपिलाबाबत अजून निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले.

"नगरसेवकपद रद्द केल्याचा आदेश मिळाला, अपिलात जाण्याबद्दल अद्याप निर्णय नाही"

हेही वाचा - छत्रपती शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमचे नगरसेवकपद रद्द

मनपाच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्याशी बोलताना भाजपचा तत्कालीन उपमहापौर असलेल्या छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मोबाईल संभाषणात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर श्रीपाद छिंदमच्या विरोधात अवघ्या महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली होती. या आक्षेपार्ह वक्तव्याची दखल नगरविकास विभागाने घेत अपक्ष नगरसेवक म्हणून पुन्हा निवडून आलेल्या छिंदम याचे विद्यमान नगरसेवकपद आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - इंदोरीकरांचा कोल्हापुरातील कार्यक्रम रद्द; पुरोगामी संघटनांनी केला होता विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.