ETV Bharat / state

साईभक्‍तांना व्हॉट्सअ‌ॅपसह मदत कक्षातून मिळणार माहिती; संस्थानने सुरू केली सुविधा

राज्यात अजून कोरोनाचे सावट संपले आहे. मंदिर खुले झाल्‍यामुळे हजारो साईभक्‍त समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे येत आहे. या साईभक्‍तांना शिर्डी येथे येण्‍यापूर्वी व आल्‍यानंतर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा व दर्शनाची परिपुर्ण माहिती सुलभरित्‍या मिळण्यासाठी साईबाबा संस्थानने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

साईबाबा मंदिर
साईबाबा मंदिर
author img

By

Published : Nov 25, 2020, 5:40 PM IST

शिर्डी(अहदमनगर)- राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर १६ नोव्हेंबरपासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले आहे. कोरोना प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर साईभक्‍तांना शिर्डीची वारी आणि दर्शन सुलभरित्‍या व्‍हावे, या उद्देशाने संस्‍थानच्‍यावतीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. संस्थानने साईभक्‍तांच्‍या सेवेकरीता हेल्पलाईन कक्ष, नियंत्रण कक्ष व व्हॉट्सअ‌ॅप ही सुविधा २४ तास सुरू केली आहे.

कोरोना महामारीची साथ चालू असल्याने राज्य सरकारने प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून १७ मार्चपासून टाळेबंदी लागू केली होती. राज्‍य सरकराने १४ नोव्हेंबरला आदेश काढून श्री साईबाबांचे समाधी मंदिर १६ नोव्‍हेंबरपासून भाविकांच्‍या दर्शनासाठी खुले करण्‍यात आलेले आहे. राज्यात अजून कोरोनाचे सावट संपले आहे. मंदिर खुले झाल्‍यामुळे हजारो साईभक्‍त समाधीच्‍या दर्शनाकरीता शिर्डी येथे येत आहे. या साईभक्‍तांना शिर्डी येथे येण्‍यापूर्वी व आल्‍यानंतर निवास, भोजन, वैद्यकीय सेवा व दर्शनाची परिपुर्ण माहिती सुलभरित्‍या मिळण्यासाठी साईबाबा संस्थानने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. साईभक्तांची फसवणुक होऊ नये, या उद्देशाने हेल्पलाईन कक्ष व नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्‍यात आलेली आहे. हे कक्ष साईभक्‍तांकरीता कायमस्‍वरुपी २४ तास उपलब्‍ध असणार आहेत.

हेही वाचा-अनलॉकनंतर शिर्डी साई मंदिर परिस्थिती.. तीन दिवसात २४ हजार भक्तांनी घेतले साईबाबांचे दर्शन

भक्तांकरिता श्री साईबाबा संस्‍थानचे उपलब्ध केले हेल्‍पलाईन मोबाईल नंबर
श्री साईबाबा संस्‍थानचे हेल्‍पलाईन मोबाईल नंबर +९१७५८८३७४४६९ / +९१७५८८३७३१८९ / +९१७५८८३७५२०४ हे नंबर आहेत. तर कंट्रोल रुम मोबाईल नंबर +९१७५८८३७१२४५ / +९१७५८८३७२२५४ आहेत. तर व्हाट्सअ‌ॅप क्रमांक +९१९४०३८२५३१४ उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेले आहेत. तरी साईभक्‍तांनी अधिक माहितीकरीता या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने करण्‍यात आले आहेत.

अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन-

'श्रद्धा आणि सबुरी महत्त्वाची असून आपले स्वास्थ्य असेल तर शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आपणास पुन्हा पुन्हा येता येईल. त्यामुळे 'सर सलामत तो पगडी पचास' असे म्हणत भाविकांनी दर्शनासाठी येताना दर्शनाची वेळ, मार्गदर्शक सूचना नीट ध्यानात घ्याव्यात. शनिवारी, रविवारी शिर्डीत अनावश्यक गर्दी टाळावी,' असे आवाहन साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी केले आहे.

हेही वाचा - 'विठ्ठला'च्या दारी पुन्हा संचारबंदी; कार्तिकी वारी निमित्ताने घेतला निर्णय

साई मंदिरात येताना दर्शनाची वेळ, मार्गदर्शक सूचना ध्यानात घ्याव्यात - मुख्य कार्यकारी अधिकारी

शिर्डीत मोजक्याच भाविकांना साई दर्शन दिले जात आहे, कोविडचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहेत. ते काटेकोर पाळले गेले नाहीत तर शिर्डीत गर्दी होईल आणि गर्दीमुळे संपूर्ण देशातून येणार्‍या भाविकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकेल. त्यानुषंगाने भाविकांनी गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बगाटे यांनी यावेळी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.