अहमदनगर - श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळेंना शिवसेनेने विधानसभा निवडणुकी आधी सेनेत प्रवेश देत उमेदवारीही दिली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळेंनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे ससाणे गट, विखे गट आणि शिवसैनिकांची कांबळेंबद्दल नाराजी असतानाही सेनेने कांबळेंना उमदवारी दिल्याने श्रीरामपूर मतदारसंघातील शिवसैनिक नाराज आहेत.
हेही वाचा - भाऊसाहेब कांबळेंच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध
श्रीरामपूर मतदारसंघाची जागा अनुसुचीत जमातींसाठी राखीव झाल्यानंतर माजी आमदार जयंत ससाणेंच्या सहकार्याने भाऊसाहेब कांबळे काँग्रेसच्या तिकीटावरून निवडूण आले होते. तर लोकसभा निवडणुकी दरम्यान विखेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर विखे समर्थक असलेल्या भाऊसाहेब कांबळेंना विखे विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरातांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यामुळे ससाणे गट आणि विखे गट नाराज होता. याचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या मतदानात झाला आणि स्वतःच्या मतदारसंघातही कांबळे पिछाडीवर गेले. त्यानंतर काही दिवसांपुर्वी कांबळेंनी काँग्रसचा हात सोडत शिवबंधन हातात बांधले होते.
हेही वाचा - अहमदनगरमधील ४२८ जणांचे शस्त्र परवाने रद्द, १ हजार १४१ जणांना जमा करण्याचे आदेश
त्यानंतरही श्रीरामपुरातुन कांबळेंना विरोधच होता, आमच ठरलयं कांबळेंना पाडायचे, असे फलक लावण्यात आले होते. अनेक शाखा प्रमुखांनी कांबळेंना तिकीट देवु नये, अशी मागणी करणारी पत्रेही उद्धव ठाकरेंना पाठवली होती. मात्र, तरीही कांबळेंनाच उमेदवारी दिल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याने कांबळेंचा प्रचार न करण्याचा निर्णय शिवसैनिकांनी घेतला आहे. तर शिवसैनिकांचा एक गट या ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.