ETV Bharat / state

'बूट फेक'प्रकरणी शिवसेनेचे अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी; जामीन अर्ज फेटाळला - शिवसेना

शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक मदन आढाव यांनी आयुक्तांसमोरच शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकावला होता. त्याप्रकरणी राठोड स्वत: पोलिसात हजर झाले.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी
author img

By

Published : Aug 2, 2019, 11:20 AM IST

अहमदनगर - महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांवर बूट फेकल्याप्रकरणी माजी मंत्री अनिल राठोड गुरुवारी तोफखाना पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केले. न्यायालयाने अनिल राठेड यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यावर राठोड यांच्या वतीने जामीनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र जामीन देण्याचा अधिकार सत्र न्यायालयाला असल्याची बाजू सरकारी वकिलांनी मांडल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी

काही दिवसापूर्वी बोल्हेगाव रस्त्याचे काम रखडलेले असल्याने शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन महानगरपालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक मदन आढाव यांनी आयुक्तांसमोरच शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकावला होता. याप्रकरणी सोनटक्के यांच्या तक्रारीवरून शिवसेना कार्यकर्ते, नगरसेवक, यांच्यासह अनिल राठोड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा, अधिकाऱ्यांना धमकावणे, शिवीगाळ आदी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अनेक आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली. परंतू विविध कार्यक्रमात हजर असलेले अनिल राठोड मात्र पोलिसांना सापडत नव्हते. अखेर राठोड हे स्वतःहून पोलिसात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले.

न्यायालयामध्ये राठोड यांच्या वतीने अॅड. विश्वासराव ताठरे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राठोड यांच्या वतीने जामीनासाठी अर्ज करण्यात आला. या जामीन अर्जाला सरकारी वकील पी. ए. कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू असल्याचे सांगत जामीन देण्याचा अधिकार या न्यायालयाला नसल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राठोड यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. अनिल राठोड यांच्या जामीनासाठी जिल्हा सत्र न्यायालयाकडे धाव घ्यावी लागणार आहे. तोपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत रहावे लागणार आहे.

Intro:अहमदनगर- 'बूट फेक' प्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी, न्यायदंडाधिकार्यांनी जामीन अर्जही फेटाळला.. Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_rathod_arriest_pkg_7204297

अहमदनगर- 'बूट फेक' प्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी, न्यायदंडाधिकार्यांनी जामीन अर्जही फेटाळला..

अहमदनगर- अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांवर बूट फेक प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना हवे असलेले शिवसेना उपनेते तथा माजी मंत्री अनिल राठोड आज तोफखाना पोलिसात हजर झाले. पोलिसांनी त्यांना मुख्य न्यायदंडाधिकार्यां समोर हजर केले असता त्यांना न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आली. त्यावर राठोड यांच्यावतीने जामीना साठी अर्ज करण्यात आला. मात्र जामीन देण्याचा अधिकार सत्र न्यायालयाला असल्याची बाजू सरकारी वकिलांनी मांडल्याने दंडाधिकाऱयांनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केला. जामीना साठी त्यांना आता जिल्हा सत्र न्यायालया कडे धाव घ्यावी लागणार आहे. तो पर्यंत त्यांना न्यायालीयन कोठडीत रहावे लागणार आहे. शिवसेनेच्या वतीने बोल्हेगाव रस्त्याचे काम रखडलेले असल्याने शिवसेना नेते उपनेते अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या दालनात धरणे आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनादरम्यान शिवसैनिक मदन आढाव यांनी आयुक्त भालसिंग यांच्या समोरच शहर अभियंता विलास सोनटक्के यांच्यावर बूट भिरकावला होता. या प्रकरणी सोनटक्के यांच्या तक्रारीवरून शिवसेना कार्यकर्ते, नगरसेवक, यांच्यासह अनिल राठोड यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा, अधिकाऱ्यांना धमकावणे,शिवीगाळ आधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी अनेक आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक केली असली तरीही विविध कार्यक्रमात हजर असलेले अनिल राठोड मात्र पोलिसांना सापडत नव्हते. अखेर आज राठोड हे स्वतःहून पोलिसांत हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना न्यायालयात आणले. या ठिकाणी राठोड यांच्या वतीने ॲडव्होकेट विश्वासराव ताठरे यांनी बाजू मांडली. त्यावर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राठोड यांच्या वतीने जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या जामीन अर्जाला सरकारी वकील पी ए कुलकर्णी यांनी आक्षेप घेत या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू असल्याचे सांगत जामीन देण्याचा अधिकार ह्या न्यायालयाला नसल्याचं सांगितलं. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर राठोड यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- 'बूट फेक' प्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांना न्यायालयीन कोठडी, न्यायदंडाधिकार्यांनी जामीन अर्जही फेटाळला..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.