ETV Bharat / state

Shirdi Samriddhi Highway Toll : गाडी घरी उभी असतानाही 40 रुपयांचा टोल, विचारायला गेलो तर धातुरमातूर उत्तर....वाचा संपूर्ण प्रकरण - हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग

नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यापासूनच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग काही ना काही गोष्टींवरून नेहमीच चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्ग 40 रूपयांवरून चर्चेत आला आहे. कोपरगाव येथील राजेंद्र खिलारी यांनी महामार्गवरून गाडी न नेता त्यांना चक्क 40 रूपयांचा भुर्दंड बसला आहे.

Shirdi Samriddhi Highway Toll
गाडी घरी उभी असतानाही 40 रुपयांचा टोल
author img

By

Published : May 9, 2023, 10:30 AM IST

कोपरगाव येथील राजेंद्र खिलारी यांनी महामार्गवरून गाडी न नेता त्यांना चक्क 40 रूपयांचा भुर्दंड बसला आहे.

अहमदनगर : कोपरगाव येथे राहणारे राजेंद्र खिलारी हे 5 मे रोजी कोपरगावहून छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. त्यांनी जाताना टोल भरला आणि येताना देखील कोपरगाव येथील कोकमठाणच्या टोलनाक्यावर फास्टटेगमध्ये पैसे शिल्लक नसल्याने सव्वाशे रुपये रोख दिले. तरी 8 मे रोजी त्यांची गाडी घरी उभी असताना त्यांना हडस पिंपळगाव टोल नाक्यावर 40 रुपये कट झाल्याचा संदेश प्राप्त झाला असल्याचे राजेंद्र खिलारी म्हणाले आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार : राजेंद्र खिलारी व सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव येथे जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरील टोल नाका व्यवस्थापनाशी संपर्क केला. तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नसल्याने सदरची 40 रुपयाची रक्कम टोलनाका व्यवस्थापनाने चोरली असल्याचे आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केले. या संबंधित विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार : समृध्दी महामार्गाचे टोल वसुलीचे व्यवस्थापनाचे काम फास्टगो इन्फ्रा या प्रायव्हेट कंपनीला देण्यात आले आहे. राजेंद्र खीलारी यांचे 40 रूपये कसे कट झाले याबाबत शिर्डी जवळील कोपरगाव येथील टोल नाक्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांना यावर विचारणा केली. त्यांनी सदरचे पैसे हडस पिंपळगाव इथून कट झाले असून तेथे चौकशी करावी असे म्हटले आहे. तसेच तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार असल्याचे देखील म्हटले आहे. तसेच एमएसआरडीसीचे टोलचे कामकाज बघणारे विजया शेनोए या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता जोपर्यंत तक्रारदार तक्रार दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही याबाबतची माहिती देऊ शकत नाही असे स्पष्ट केले आहे.

सर्वच प्रवाशी तक्रार करणार का ? : दरम्यान समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर प्रवाशांना कोणतीही पूर्व सूचना न देता पैसे कापतात कसे ? वाहन जर घरी उभे असेल तर पैसे कट करण्याचा संबंध काय ? तक्रार केल्यावर पैसे परत मिळणार असे म्हटले आहे. परंतु सर्वच प्रवाशी तक्रार करणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून एमएसआरडी सीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून टोल व्यवस्थापनाचा हा सावळा गोंधळ थांबवावा, अशीच मागणी यावेळी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केली आहे.

हेही वाचा : The Kerala Story News : द केरळ स्टोरीच्या क्रू मेंबरला धमकी, मुंबई पोलिसांनी पुरविली सुरक्षा
हेही वाचा : Maharashtra students Reach Mumbai: मणिपूरमधील हिंसाचारात अडकलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी पोहोचले मुंबईत
हेही वाचा : Jio Compulsory For Government Employee : गुजरातच्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता जिओ वापरणे बंधनकारक, सरकारने काढली अधिसूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.