अहमदनगर- श्रावण महिन्यात साईबाबांना ( Shirdi Sai Temple ) आपले गुरु मानणारे लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी दाखल होतात. साईबाबांच्या समाधीचे ( Saibaba Darshan ) दर्शन घेऊन प्रत्येक भक्त आज स्वत:ला धन्य मानत आहेत.
कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर शिर्डी साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले ( Shravn Shirdi darshan ) त्यानंतर अवघ्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत तब्बल 188 कोटी 55 लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले. त्याचबरोबर मंदिर खुले झाल्यानंतर पाच महिन्यांतच 41 लाख भाविकांनी शिर्डीला येऊन साईबाबा समाधीचे ( Saibaba Darshan today ) दर्शन घेतले आहे.
साईबाबा मंदिर परिसरात असलेले साईबाबांचे वस्तुसंग्रहालय व ध्यान मंदिर भाविकांनासाठी साई संस्थानकडून खुले करण्यात आले आहे. या वस्तुसंग्रहालयात साईबाबांनी वापरलेले जोडे, कफनी चिलीम, उशा, गादी, रथ, पालखी, पलंग अशा अनेक वस्तू माहितीसह दर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या आहेत. साईबाबांनी हाताळलेल्या वस्तुंबाबत भाविकांना माहिती व्हावी यासाठी मंदिर परिसरातील दिक्षित वाड्यामध्ये हे वस्तू संग्रहालय उभारण्यात आले असुन या ठिकाणी साईबाबांनी वापरलेले जोडे, कफनी, चिलिम, उशा, गादी, रथ, पालखी, पलंग अशा अनेक वस्तू माहितीसह दर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ध्यान, साधना व नामस्मरण करता यावे, म्हणून संस्थानमार्फत श्री साईसत्यव्रत हॉलच्या पहिल्या मजल्यावर नव्याने ध्यान मंदिर तयार करण्यात आलेले आहे.