ETV Bharat / state

राज्‍यातील पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी धावले साई संस्थान, १० कोटी रुपयांची मदत - saibaba

साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍यावतीने राज्‍यातील पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्‍यात येणार आहे. हा निधी न्यायालयाच्या अधीन राहून मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी धावले साई संस्थान,
author img

By

Published : Aug 10, 2019, 1:33 PM IST

Updated : Aug 10, 2019, 2:28 PM IST

अहमदनगर - राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शिर्डीतील साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍थेच्यावतीने १० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्‍याची माहिती संस्थानचे अध्‍यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी दिली.

राज्‍यातील पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी धावले साई संस्थान,

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या जलप्रलयाच्‍या थैमानामुळे विशेषत: पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. तसेच अनेक गावेही उद्ध्‍वस्‍त झाली आहेत.

ही एक भीषण नैसर्गिक आपत्‍ती आहे. त्यामुळे आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजून या पूरग्रस्‍तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था, शिर्डीच्‍यावतीने घेण्‍यात आलेला आहे. सदरचा निधी न्‍यायालयीन प्रक्रियेस अधीन राहून मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार आहे. संस्‍थानच्‍यावतीने परिस्‍थिती बघून वैद्यकीय पथक व औषधेही पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

राज्‍य सरकार पूरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्‍यात आलेली ही आपत्‍ती मोठी असून या आपत्‍तीतून बाहेर पडण्‍यासाठी श्री साईबाबांच्‍या चरणी प्रार्थना करत असल्‍याचे डॉ. हावरे यांनी यावेळी सांगितले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था शिर्डीच्‍या वतीने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी न्‍यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली....

VO_साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे म्‍हणाले, राज्‍यामध्‍ये मुसळधार पावसामुळे भीषण पुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. या जलप्रलयाच्‍या थैमानामुळे विशेषताः पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापुर, सांगली, सातारा या जिल्‍ह्यातील जनजीवन विस्‍कळीत झाले असून परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर झाले असून अनेक गांवेही उध्‍वस्‍त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्‍ती भीषण असून आपले राष्‍ट्रीय कर्तव्‍य समजुन या पुरग्रस्‍तांसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्‍याचा निर्णय श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने घेण्‍यात आलेला आहे. सदरचा निधी न्‍यायालयीन प्रक्रीयेस अधिन राहुन मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीस देण्‍यात येणार असुन संस्‍थानच्‍या वतीने परिस्‍थीती बघुन वैद्यकीय पथक व औषधे ही पाठविणार आहे....
राज्‍य शासन पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्‍यात आलेली ही आपत्‍ती मोठी असून या आपत्‍तीतुन बाहेर पडण्‍यासाठी श्री साईबाबांच्‍या चरणी प्रार्थना करीत असल्‍याचे डॉ.हावरे यांनी सांगितले....Body:mh_ahm_shirdi_sai trust help_10_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sai trust help_10_visuals_bite_mh10010
Last Updated : Aug 10, 2019, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.