ETV Bharat / state

COVID 19 : शिर्डी साई संस्थानकडून आरोग्य साधनांसाठी देणगी करण्याचे आवाहन - sai baba hospital health

शिर्डीच्या साई संस्थानला कोट्यावधीचा दान येतो. मात्र, सध्या आरोग्य साधनांची गरज असल्याने ती दान स्वरुपात देण्याची विनंती साईभक्तांना करण्यात आली आहे.

Shirdi Sai Sansthan health equipment
साईबाबा हॉस्पिटल
author img

By

Published : Jan 8, 2022, 3:36 PM IST

अहमदनगर - कोरोना काळात पैशांऐवजी सक्षम आरोग्य सुविधा गरजेच्या आहेत. त्यामुळे, आता देवस्थानेही भाविकांकडून आरोग्य साधने दान करण्याचे आवाहन करत आहेत. शिर्डीच्या साई संस्थानला कोट्यावधीचा दान येतो. मात्र, सध्या आरोग्य साधनांची गरज असल्याने ती दान स्वरुपात देण्याची विनंती साईभक्तांना करण्यात आली आहे.

माहिती देताना संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत

हेही वाचा - Village Destroyed : काही क्षणात होत्याचे नव्हते झाले अर्धे गाव उध्वस्त

वैद्यकीय साहित्‍यांची आवश्‍यकता

कोविड 19 च्या ओमायक्रॉन व्‍हेरिएंटच्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या असून योग्य उपाय - योजनाही केल्या जात आहेत. कोविड रुग्‍णांकरीता व्‍हेंटिलेटर, लिक्‍विड ऑक्‍सिजन प्‍लांट आणि ड्युरा सिलेंडर तसेच, इतर वैद्यकीय साहित्‍यांची आवश्‍यकता असून या साहित्‍यांकरीता देणगी देवू इच्‍छीणाऱ्या साईभक्‍तांनी संस्‍थानच्‍या श्री. साईबाबा हॉस्पिटल आणि जनसंपर्क कार्यालय यांच्‍याशी संपर्क करावा, असे आवाहान संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी केल आहे.

नाशिक विभागीय महसूल आयुक्तांनी केल्या होत्या या सूचना

नुकतेच नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूच्या संभाव्‍य लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर करावयाच्‍या उपाय - योजनांकरीता आढावा बैठक शिर्डीत घेण्यात आली होती. यावेळी गमे यांनी प्रति दिवस 5 हजार व्‍यक्‍तींपर्यंत आरटी - पीसीआर तपासणी क्षमता वाढविणे, जिनोम सिक्‍वेन्सिंग लॅब उभारणी करणे, दोन लिक्‍विड मेडीकल ऑक्‍सिजन प्लांट भाडेतत्‍वावर घेणे, साई आश्रम फेज 2 येथे कोविड रुग्‍णांकरीता सुमारे 300 खाटांचे ऑक्‍सिजन बेड वाढविणे, दोन लिक्‍विड ऑक्‍सिजन प्‍लांट, व्‍हेंटिलेटर तसेच, वैद्यकीय साहित्‍य तसेच, आवश्‍यक पायाभूत सुविधा उभाराव्या, अशा सुचना केल्‍या होत्‍या.

देणगीसाठी संपर्क क्रमांक

या पार्श्वभूमीवर साई आश्रम फेज 2 साई धर्मशाळा येथे संभाव्‍य तिसऱ्या लाटेसाठी कोविड हॉस्पिटल उभारणीचे काम सुरू असून याकामी आवश्‍यक असलेले 50 व्‍हेंटिलेटर, 10 पीडिएट्रिक व्‍हेंटिलेटर, 2 लिक्‍विड ऑक्‍सिजन प्‍लांट व 100 ड्युरा सिलेंडर, 100 जम्‍बो सिलेंडर, जिनोम सिक्‍वेन्सिंग लॅब उभारणी व ऑक्‍सिजन बेडकरीता ऑक्‍सिजन पाईपलाईन या व इतर वैद्यकीय साहित्‍यांची आवश्‍यकता आहे. तरी वरील कामासाठी इच्‍छुक देणगीदार साईभक्‍तांनी देणगीकामी श्री. साईबाबा हॉस्पिटल मो.क्र. ८७८८४३८४९१ व जनसंपर्क विभाग मो.क्र. ९४०४५९२५९९ या भ्रमणध्‍वनींवर संपर्क करावा. तसेच, जास्‍तीत जास्‍त देणगीदारांनी सढळ हाताने देणगी द्यावी, असे आवाहन बानायत यांनी केले.

हेही वाचा - Four Injured in Gas Cylinder Blast : गॅस सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.