ETV Bharat / state

शिर्डीत चालणाऱ्या तीन दिवसीय पुण्‍यतिथी उत्‍सवाचा आज मुख्य दिवस - श्री साईसच्‍चरित पवित्र ग्रंथ

साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या आज मुख्य दिवशी पहाटे ०४.३० वाजता साईबाबांची काकड आरती झाल्‍यानंतर 'साईसच्‍चरित्र' या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली आहे.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Oct 25, 2020, 4:40 PM IST

अहमदनगर - साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या साई पुण्‍यतिथी उत्‍सवाचा आज मुख्‍य दिवस असून मंदिर बंद असल्याने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी जाता येत नसल्याने भाविक मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानत आहेत.

शिर्डीत चालणाऱ्या तीन दिवशी पुण्‍यतिथी उत्‍सवाचा आज मुख्य दिवस

साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या आज मुख्य दिवशी पहाटे ०४.३० वाजता साईबाबांची काकड आरती झाल्‍यानंतर 'साईसच्‍चरित्र' या पवित्र ग्रंथाच्‍या अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली आहे. या मिरवणुकीत संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हुराज बगाटे यांनी वीणा, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पोथी आणि मुख्‍य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी प्रतिमा धरून सहभाग नोंदवला.

सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हुराज बगाटे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी संगिता बगाटे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात पाद्यपूजा व आराधना विधी करण्‍यात आली. सकाळी ०९.०० वाजता संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हुराज बगाटे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पूजन करून ध्वज बदलणे व समाधी मंदिरात काढण्‍यात आलेल्‍या प्रतिकात्‍मक भिक्षा झोळी कार्यक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.

हेही वाचा - विजयादशमी निमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झेंडूची आरास

भिक्षा झोळीकरीता गावकरी व साईभक्‍तांकडून दान भिक्षा स्वीकारण्‍याकामी मंदिर परिसरातील गेट नंबर ०४, पिंपळवाडी रोड गेट नंबर ०२, चावडी समोर, नाट्यगृहाशेजारी तसेच साईनगर मैदान येथे काऊंटर्सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली होती. सकाळी १०.०० वाजता मंदिर पुजारी उल्‍हास वाळुंजकर यांचा कीर्तन कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजता साईबाबांची माध्‍यान्‍ह आरती करण्यात आली. यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने कोईमतूर येथील दानशूर साईभक्त नाकाराजा यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व शनि शिंगणापूर येथील शनेश्‍वर लाईट डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई केली.

लॉकडाऊनमुळे गेल्या 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. आज साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांनी साई दर्शनासाठी शिर्डीत गर्दी केलेली पाहायला मिळत होती. मात्र, मंदिर बंद असल्याने भाविकांनी साई मंदिराचा कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानले.

हेही वाचा - राज्यातील महत्त्वाच्या दसरा महोत्सवांवर एक नजर; 'ईटीव्ही भारत'वर पाहा लाईव्ह...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.