ETV Bharat / state

राहाता तालुक्यात गावठी दारू विकणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात, 6500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत - shirdi police station

लॉकडाऊनच्या काळात स्थानिक गुन्हे पथक शिर्डी भागात पेट्रोलिग करत असताना सावळीविहिर सोनेवाडी रोडवर पाटाच्या कडेला आप्पासाहेब शिरसागर आणि महिला सोनी विनोद हे गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

shirdi police
shirdi police
author img

By

Published : May 4, 2020, 12:19 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथे गावठी हातभट्टी दारू विक्री करत असताना दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे 6,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात स्थानिक गुन्हे पथक शिर्डी भागात पेट्रोलिग करत असताना सावळीविहिर सोनेवाडी रोडवर पाटाच्या कडेला आप्पासाहेब शिरसागर आणि महिला सोनी विनोद हे गावठी हातभट्टीची दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले आहे. या छाप्यात पोलिसांनी 6500 रुपयांची गावठी दारू हस्तगत केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली आहे. आप्पासाहेब शिरसागर आणि सोनी जाधव यांच्याविरुद्ध शिर्डी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी अधिक माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.