अहमदनगर- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. भाविक शिर्डीला येऊ शकत नाहीत. त्यामुळे मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना प्रसाद स्वरुपात दिली जाणारी साईंची उदी पोस्टाद्वारे भाविकांना पाठवण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे. त्याबबतची सर्व तयारी करण्यात आली आहे.
साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी शिर्डीत येणाऱ्या हजारो भाविकांना संस्थानच्या वतीने साई प्रसाद स्वरुपात उदी दिली जाते. मंदिरात साईबाबांनी आपल्या हाताने प्रज्वलित केलेली धुनीचेही भाविक दर्शन घेतात. या धुनीत चंदन, सातपुडा पर्वत रांगेतून आणलेली राणगोवरी आणि लाकडाचा वापर केला जातो. यातून तयार होणारी उदी भाविकांना प्रसाद म्हणून दिली जाते. सध्या भाविकांना लॉकडाऊनमुळे शिर्डीत येता येत नाही. मात्र, येथील धुनी अखंडीत प्रज्वलित आहे. त्यामुळे धुनीतील उदी भाविकांना घरपोच देण्याचा उपक्रम येथील ग्रामस्थांनी आखला आहे. उदीचे सुमारे तेरा लाख पाकीटे तयार करण्यात आली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
हेही वाचा- रिस्टार्ट मुंबई : मुंबईतील रस्त्यांवर वाहनांची गर्दी, दुकानेही उघडली