शिर्डी (अहमदनगर) : बोटा परिसरातील केळेवाडी येथील उत्तम बाळाजी कुर्हाडे ( वय ६३ वर्षे) हे राहात होते. शनिवारी पावने आठ ते आठ वाजेच्या दरम्यान ते आणि त्यांची आई कासाबाई हे दोघेजण घरात होते. त्याच दरम्यान बिबट्याने थेट घरात घुसून कुर्हाडे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे ते जागीच ठार झाले. त्यानंतर बिबट्याने धूम ठोकली. कासाबाई यांनी घराच्या बाहेर येवून जोरजोराने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूला असलेल्या भावबंधांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यानंतर काहींनी घटनेची माहिती घारगाव पोलिस व वनविभागाला दिली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
खून केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड : तर समोर उत्तम कुर्हाडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर कुर्हाडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात पाठवण्यात आला होता. रविवार( ता. २३) एप्रिल रोजी सकाळी कुऱ्हाडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. उत्तम कुर्हाडे यांच्यावर अज्ञात इसमाने धारदार हत्याराने छातीवर, पाठीवर व हातावर वार करून त्यांचा खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून आज उघड झाले. त्यामुळे याप्रकरणी घारगाव पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक राजेंद्र लांघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २०३/ २०२३ भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे. दरम्यान आज अप्पर पोलीस अधीक्षिका स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे.
पठारभागासह तालुक्यात उलट सुलट चर्चला उधाण : दरम्यान उत्तम कुर्हाडे यांचा परिसरात कोणाशी वाद होता का ? याचा तपासही पोलीस करत आहे. कुर्हाडे यांचा खून नेमकी कोणी केला आणि कशासाठी केला. हे आता घारगाव पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. सुरूवातीला बिबट्याच्या हल्ल्यातच कुर्हाडे यांचा मृत्यृ झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र खरे कारण हे शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. त्यामुळे याप्रकरणावरून आता पठारभागासह तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
हेही वाचा : smuggling puppies and cat : मलेशियातून मांजराची तस्करी केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या नागरिकाला शिक्षा