ETV Bharat / state

साई संस्थानच्या जागेवर शिर्डी नगरपंचायतीचे अतिक्रमण, न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस

नगरपंचायतीकडून अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येते. मात्र नगरपंचायतीनेच अतिक्रमण केल्याचा प्रकार शिर्डीमध्ये समोर आलाय. शिर्डी नगरपंचायतीने साईबाबा संस्थानाच्या जागेवर अतिक्रमण करत, इमारत बांधल्याचा प्रकार चौकशीतून समोर आला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून शिर्डी नगरपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये.

Shirdi Nagar Panchayat encroachment on Sai Sansthan site
साई संस्थानाच्या जागेवर शिर्डी नगरपंचायतीचे अतिक्रमण
author img

By

Published : Oct 11, 2020, 5:20 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - नगरपंचायतीकडून अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात येते. मात्र नगरपंचायतीनेच अतिक्रमण केल्याचा प्रकार शिर्डीमध्ये समोर आलाय. शिर्डी नगरपंचायतीने साईबाबा संस्थानाच्या जागेवर अतिक्रमण करत, इमारत बांधल्याचा प्रकार चौकशीतून समोर आलाय. याप्रकरणी उच्च न्यायालयाकडून शिर्डी नगरपंचायतीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीये. तसेच साईबाबा संस्थानाला देखील तीन आठवड्यात आपले म्हणणे मांडण्यास सांगीतले आहे.

साई संस्थानाच्या जागेवर शिर्डी नगरपंचायतीचे अतिक्रमण

शिर्डी शहरातील नांदुर्खी रोड लगत नगरपंचायतीच्या हद्दीत साईबाबा संस्थानची रुग्णालयासाठी आरक्षित जागा आहे. रुग्णालयासाठी आरक्षीत असलेल्या या जागेवर शासनाची तसेच शिर्डी संस्थानाची परवानगी न घेता नगरपंचायतीने बेकायदेशीर बांधकाम सुरू केल्याचं आढळून आलं आहे.या बेकायदेशीर बांधकामावर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून हरकत घेण्यात आलीये. तसेच अतिक्रमण करत बांधकाम केल्याप्रकरणी सामाजीक कार्यकर्ते संजय काळे आणि संदीप कुलकर्णी यांनी नगरपंचायतीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने नगरपंचायतीला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच साईबाबा संस्थानाला नोटीस बजावली असून, तीन आठवड्यात आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान आता न्यायालय अतिक्रमण करणाऱ्या नगरपंचायतीच्या विरोधात काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.