अहमदनगर Shirdi Mhalsapati Death Anniversary: प्रत्यक्ष साईबाबांचं नामकरण करणारे परमभक्त व ज्यांच्या उल्लेखाशिवाय श्री साईचरित्र पुर्ण होवू शकत नाही, असे साईबाबांचे निकटवर्तीय म्हाळसापती नागरे यांच्या निर्वाणाला आज 101 वर्ष पुर्ण होत आहेत. या निमित्तानं 'आओ साई खंडोबा मंदिरा'च्या वतीनं पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
साईबाबांचं केलं स्वागत : लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर शिर्डीत आलेल्या एका फकीराचं म्हाळसापतींनी (Mhalsapati who naming Sai Baba) या खंडोबा मंदिरात 'आओ साई' म्हणून स्वागत केलं होतं. तेव्हापासून ते साईबाबा या नावानेच ओळखले जावू लागले. म्हाळसापती चिमणाजी सोनार नागरे हे शिर्डीच्या खंडोबा मंदिराचे पुजारी होते. शिर्डी लगतच्या निमगाव येथील प्राचीन खंडोबा देवस्थानाच्या पुजाअर्चेचा मानही म्हाळसापतींना होता. म्हाळसापतींनी बाबांचं केवळ नामकरणच केलं नाही, तर त्यांनी आपले मित्र काशिराम शिंपी व आप्पा जागले यांना साईबाबांची ओळख करून दिली.
सर्वधर्मिय भाविकांचे श्रद्धास्थान : आज द्वारकामाई मशीद जगभरातील करोडो सर्वधर्मिय भाविकांचं श्रद्धास्थान आहे. मात्र साईबाबा शिर्डीत आले, तेव्हा म्हाळसापतींनीच आपल्या या दोन मित्रांच्या मदतीनेच मारुती मंदिरासमोरील पडक्या मशीदीची साफसफाई करून तेथे बाबांची राहण्याची व्यवस्था केली. साईबाबांच्या पुजेचा अगदी पहिला मान याच द्वारकामाईत म्हाळसापतींना मिळाला. ते साईबाबांच्या पायांना गंध लावीत (Mhalsapati Death Anniversary) होते.
म्हाळसापतींनी बाबांचे पाय चेपले : अनेक वर्षे साईबाबांसोबत द्वारकामाईत झोपण्याचं भाग्य म्हाळसापती व तात्या पाटील कोते यांना लाभलं. तिघे तीन दिशांना डोके करून व पाय मध्यभागी पाय ठेवून झोपत. रात्रभर साईबाबा म्हाळसापतींना पाय चेपायला सांगून जागरण करायला भाग पाडीत. 1910 पासून साईबाबा दिवसाआड चावडीत झोपायला जात. बाबांच्या चावडी मुक्कामाच्या दिवशी म्हाळसापती घरी झोपत. चावडीत झोपायला जाणाऱ्या साईबाबांना भाविक एखाद्या राजा किंंवा संस्थानिकाप्रमाणे मिरवणुकीने नेत. या मिरवणुकीत म्हाळसापती सुरुवातीला बाबांचा उजवा हात धरून, तरनंतर त्यांच्या कफनीचं टोक धरून सोबत चालत.
बाबांचे निर्धन भक्त : साईनगरीतील खंडोबा मंदिरात उपासनी महाराज तसेच संत मेहेरबाबा अनेक दिवस वास्तव्याला होते. म्हाळसापतींना या सत्पुरूषांचाही सहवास लाभला. म्हाळसापती लौकिकदृष्ट्या बाबांचे निर्धन भक्त होते. साईबाबा अनेकांना काहीही न करता रोज पैसे देत. पण म्हाळसापतींना देत नसत. किंवा कुणी भक्त देवू लागला तर देवुही देत नसत. बाबांनी मोह मायेपासुन दुर ठेवत म्हाळसापतींचा मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर केला. दुपारी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीनंतर आजही म्हाळसापतींच्या समाधीला साई संस्थानच्यावतीनं नैवेद्य पाठवला (Shirdi Mhalsapati Death Anniversary 101) जातो.
पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन : 12 सप्टेंबर 1922 रोजी म्हाळसापतींचे निर्वाण झाले. आज त्यांच्या निर्वाणाला 101 वर्ष होत आहेत. या दरम्यान म्हाळसापती महाराज ट्रस्ट व शिर्डीच्या 'आओ साई खंडोबा मंदिरा'च्या वतीनं पुण्यतिथी सोहळा साजरा होतोय. सकाळी 8 वाजता म्हाळसापती समाधी येथे अभिषेक पूजा आणि श्री खंडोबा मंदिर येथे श्री म्हाळसापती महाराजांच्या मूर्तीची तसेच फोटोची विधिवत पूजा करण्यात आली. सकाळी 9 वाजता सत्यनारायण पूजा व 11 वाजता गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं गेलं. दुपारी 12 वाजता माध्यन्ह आरती झाली. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलंय. दरवर्षी म्हाळसापतींचा पुण्यतिथी उत्सव पाच दिवस साजरा करण्यात येतो. मात्र, यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळं एकच दिवस उत्सव साजरा करण्यात येतोय, अशी माहिती म्हाळसापती मंदिराचे अध्यक्ष संदीप नागरे यांनी दिलीय.
हेही वाचा :
- Centenary Celebration In Shirdi साईबाबांच साई नामकरण करणाऱ्या म्हाळसापतींच्या निर्वाणाला शंभर वर्षे; साईनगरीत 5 दिवसीय पुण्यतिथी शताब्दी सोहळ्याचे आयोजन
- Sai Baba Temple Shirdi : साईबाबांचे व्दारकामाई मंदिर पुर्वीप्रमाणे खुले; भाविकांसह शिर्डी ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव
- Divine Sai Baba Robot: काय सांगता, प्रत्यक्ष साईबाबाच अवतरले पृथ्वीवर.. भक्तांशी बोलून देत आहेत उपदेश, पहा काय आहे प्रकरण?