ETV Bharat / state

Shirdi Festival Preparations Complete : शिर्डी मोहत्सवाची तयारी पुर्ण, नव्या वर्षाच्या स्‍वागताला कार्यक्रम - नाताळ सुट्टी निमित्त शिर्डी व्यवस्था सज्ज

साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था शिर्डीच्‍या (Shirdi festival Preparations complete) वतीने नाताळ सुट्टी (Christmas vacation) चालु वर्षाला निरोप (Good Bye To Current Year) व नवीन वर्षाचे स्‍वागता (Well Come Of New Year) निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण झाली आहे. यानिमित्‍ताने शनिवार दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी विविध सांस्‍कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले आहे. अशी माहिती संस्‍थानचे प्रमुख मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

Shirdi Festival Preparations Complete
शिर्डी महोत्‍सवाची तयारी पुर्ण
author img

By

Published : Dec 24, 2022, 12:37 PM IST

अहमदनगर : दरवर्षी नाताळ सुट्टी (Christmas vacation), चालू वर्षाला निरोप (Good Bye To Current Year) व नवीन वर्षाचे स्‍वागता (Well Come Of New Year) निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत (Shirdi festival Preparations complete) असतात. या येणा-या साईभक्‍तांची होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात १० हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. तसेच अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थेसाठी साईधर्मशाळा व भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम) या ठिकाणी २८ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्‍यात आलेले आहे. साईभक्‍तांकरीता सुमारे ३५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्‍यात आलेले आहे. उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे, यासाठी श्री साईनाथ मंगल कार्यालय, व्‍दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साईकॉम्‍प्‍लेक्‍स, गेट नंबर ०५, श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत, शिर्डी विमानतळ व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे.

तसेच दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स, साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. याकालावधीत भक्‍तांच्‍या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम व नविन श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्‍तनिवासस्‍थान व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्‍णवाहीका तैनात ठेवण्‍यात येणार आहे. तसेच सुरक्षेकामी ०१ पोलिस निरिक्षक, ०६ पोलिस उपनिरिक्षक, ७५ पोलिस कर्मचारी, एक सिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्‍ब शोधक पथक तैनात आहे. तसेच बंदोबस्‍तासाठी अतिरिक्‍त ०४ पोलिस निरिक्षक, २२ सहाय्यक पोलिस निरिक्षक, २५० पुरुष पोलिस कर्मचारी व ६० महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्‍यात येवून याव्‍यतिरिक्‍त संस्‍थानचे ०१ पोलिस निरिक्षक व ९३० सुरक्षा कर्मचारी आहेत.

नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिर्डी महोत्‍सवा निमित्‍ताने शनिवार दिनांक ३१ डिसेंबर २०२२ रोजी विविध सां‍स्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. दुपारी ०२.०० ते ०३.०० यावेळेत जगदिश मारुती पाटील- ठाणे, दुपारी ०३.०० ते ०४.०० यावेळेत श्री साई स्‍वरांजली संगीत संच- नागपुर, दुपारी ०४.०० ते ०५.३० यावेळेत विजय पार्सेकर- मुंबई, रात्री ०७.०० ते ०८.३० यावेळेत भक्‍ती साखरकर, मुंबई व रात्री ०८.३० ते १०.०० यावेळेत स्‍वरश्री प्रतिष्‍ठान (अंध व जेष्‍ठ नागरिक यांचा सहभाग), मुंबई आदी कलाकारांचे साईभजने व भक्‍ती गीतांच्‍या कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. हे सर्व कार्यक्रम हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपातील स्‍टेजवर होणार आहे. तर शिर्डी महोत्‍सवानिमित्‍ताने आयोजित करण्‍यात आलेल्‍या साईभजन संध्‍या कार्यक्रमांचा जास्‍तीत-जास्‍त श्रोत्‍यांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहनही जाधव यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.