ETV Bharat / state

Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray: 'कितीही संजय कदम आणि उद्धव ठाकरे आले तरी योगेश कदमला पराभूत करु शकणार नाही'- रामदास कदम - रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिवसेना नेमकी कुणाची यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे समर्थक रामदास कदम यांनी शिर्डीला साईबाबांच्या दरबारी साकडे घातले. 'कितीही संजय कदम आणि उद्धव ठाकरे आले तरी योगेश कदमला पराभूत करु शकणार नाही', असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला.

Ramdas Kadam criticizes Uddhav Thackeray
रामदास कदम, शिंदे समर्थक
author img

By

Published : Jan 20, 2023, 4:05 PM IST

रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका

शिर्डी (अहमदनगर) : धनुष्यबाण आणि शिवसेना ही शिंदे गटालाच मिळणार असा विश्वास कदम यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीनंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. यावेळी शिर्डीत रामदास कदम यांची खदखद पुन्हा एकदा बाहेर पडल्याचे दिसून आले. मुलगा योगश कदम आणि मला राजकारणातून संपवण्याचे पाप उध्दव ठाकरे आणि अनिल परब यांनी केले. मात्र, त्यांना अपयश आले. शिवसेना फोडण्यासाठी अनिल परब आणि उध्दव ठाकरे हेच जबाबदार आहेत. असे कितीही संजय कदम आणि उद्धव ठाकरे आले तरी दापोली मतदार संघातून योगेश कदमला पराभूत करु शकणार नाही.

रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना आव्हान : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोनदा मंत्रालयात आले खरे तर यांची नोंद 'गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये होणे अपेक्षित आहे. रामदास कदम साईबाबांचे निस्सिम भक्त आहेत. नेहमीच ते शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. आजही ते परिवारासोबत शिर्डीला आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले.

रामदास कदम यांचा आरोप : उध्दव ठाकरेंनी स्वत:च्या पक्षातीलच लोकांना संपविण्याचे काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणाऱ्यांना आदीत्य ठाकरेसाठी संपविण्यात आले असल्याचा घाणाघाती आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे.

अनिल परब यांची ठाकरेंविषयी सहानुभूती : कालच उध्दव ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी शिर्डीत साई दर्शनानंतर शिंदे गटाने केलेल्या बंडाबाबत बोलताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर सगळे जण मोठे झाले. मात्र, आज मुख्यमंत्री राहिलेल्या उध्दव ठाकरेंना मुंबईतील कार्यक्रमास निमंत्रण न देता सामान्य आमदारासारखी वागणूक दिली जात आहे. वेळ बदलतो लक्षात ठेवा, असा इशारा शिंदे गटाला दिला होता. त्याला रामदास कदमांनी प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार व्हावे लागले. त्यामुळे, दिवस बदलत राहतात हे तुम्हीही लक्षात ठेवा असा टोला लगाविला.

काय म्हणाले होते अनिल परब ? : मी परिवहनमंत्री असतांना भाजपचे गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी बस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून त्यांना समाविष्ट करून घेण्यात यावे. यासाठी 5 महिने यांनी महाराष्ट्रातील जनतेला विठीस धरले होते. आज एसटी कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही. सरकारने न्यायालयात अंडरटेकींग दिले आहे की, आम्ही बस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत देऊ. त्याचासाठी पैसे देईल. मात्र, अजूनही त्यावर काही होत नाही. कुठे गेले आता पडळकर आणि सदाभाऊ खोत? आता का मूक गिळून बसले असल्याची टीका अनिल परब 19 जानेवारी, 2023 रोजी शिर्डी भेटीदरम्यान केली होती. आता बस कर्मचाऱ्यांच्या पगारावर कोणाचीही बोलण्याची मनस्थिती नाही. कारण, त्यावेळी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा स्टंट होता आणि आता तो स्टंट उघडा झाला आहे. पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना बस कर्मचाऱ्यांचा बाबतीत किती कळवळ हे उघड झाले आहे, असेही परब यावेळी म्हणाले होते.

हेही वाचा : Madrassa in Mumbai : मुंबईत मुस्लिम विद्यार्थी शाळेत जात असल्याने पूर्णवेळ मदरसे नाहीत - मदरशातील शिक्षकांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.