अहमदनगर Shilpa Shetty Sai Baba Darshan : अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुन्द्रासह आपल्या नवीन येणाऱ्या 'सुखी' चित्रपटाच्या यशासाठी साईचरणी नतमस्तक झालीय. शिल्पा शेट्टी आणि राज कुन्द्रा यांनी आज शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलंय. यावेळी शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुन्द्रा यांनी साईबाबांच्या माध्यन्ह आरतीला हजेरी लावलीय. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं शिर्डीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय.
सुखी राहण्यासाठी साईबाबांचा आशीर्वाद : यावेळी शिल्पाने सांगितलं की, सगळ्यांना माहिती आहे की, मी साईबाबांची परमभक्त आहे. सुखी राहण्यासाठी साईबाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी नेहमीच येत असते. तसंच आजही आलेय. येत्या 22 सप्टेंबर रोजी माझा सुखी हा नवीन चित्रपट (Shilpa Shetty new movie) येणार आहे. सुखी चित्रपटासाठी उद्यापासून प्रमोशनला सुरुवात करण्यात येतेय. याआधी शिर्डीत येवून साईबाबाचं दर्शन (Sai Baba Darshan) घेऊन साईबाबांचरणी नवीन येणाऱ्या सुखी चित्रपटाचं पोस्टर ठेवलंय. या चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केलीय, असं यावेळी माध्यमांशी बोलताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी म्हणालीय.
चित्रपट यशस्वीतेसाठी केलीय प्रार्थना : अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि पती राजकुन्द्रा यांनी आज शिर्डीत येत साईबाबांच्या माध्यन्ह आरतीला हजेरी लावलीय. साईबाबांच्या आरतीनंतर शिल्पा आणि पती राजकुन्द्रा यांनी साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. शिल्पाने नवीन येणारा चित्रपट 'सुखी'चं पोस्टर साईबाबाचरणी ठेवलंय. आपला चित्रपट यशस्वी होवा, यासाठी प्रार्थना केलीय. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं शिल्पा आणि पती राज कुन्द्रा यांचा शाल आणि साई मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिल्पा शेट्टी आणि राज कुन्द्रा यांनी साईबाबांच्या द्वारकामाई, गुरुस्थान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. (Shilpa Shetty in shirdi)
साईचरणी प्रार्थना : शिल्पा शेट्टी याअगोदर जानेवारी महिन्यात शिर्डीत आली होती. त्यावेळी तिनं कुटुंबाच्या सुख शांततेसाठी साईचरणी प्रार्थना केल्याचं सांगितलं होतं. नविन वर्षात एक हिंदी चित्रपट आणी दोन वेबसीरीज येतील, असंही त्यावेळी सांगितलं होतं. तसंच अभिनेत्री रविना टंडनने देखील 17 जानेवारी, 2023 रोजी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं होतं.
हेही वाचा :