अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेले शनिशिंगणापूर येथील शनीचे मंदिर आज पाडव्याच्या मुहूर्तावर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यानंतर तब्बल आठ महिन्यानंतर धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी मिळताच आज शनिशिंगणापूरमधील शनीचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.
आज पहाटे साडेचार वाजता शनीची आरती करण्यात आली. त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करून देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन भाविकांकडून होत असल्याचे याठिकाणी पाहायला मिळत आहे. भाविकांची मंदिरात पहिल्या दिवशी तुरळक गर्दी होती. मात्र तब्बल आठ महिन्यानंतर मंदिर सुरू झाल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.
तब्बल आठ महिन्यानंतर देवदर्शन
गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळे बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात असलेले दोन प्रमुख धार्मिक स्थळे शिर्डीतील साईबाबा मंदिर त्याचबरोबर शनिशिंगणापूर येथील शनी मंदिर देखील भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल आठ महिन्यानंतर धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी मिळताच आज शनिशिंगणापूरमधील शनीचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.आज पहाटे साडेचार वाजता शनीची आरती करण्यात आली, त्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करून देण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून जारी करण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन भाविकांकडून होत असल्याचे याठिकाणी पाहायला मिळत आहे. भाविकांची मंदिरात पहिल्या दिवशी तुरळक गर्दी होती. मात्र येत्या काळात गर्दी वाढणार असल्याचा आंदाज ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. मंदिरे भक्तांसाठी जरी बंद असली, तरी देखील या ठिकाणी देवांच्या पुजा आरत्या नियमितपणे सुरू होत्या. त्यानंतर मंदिर सुरू करण्यासाठी विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. मंदिर उघडण्याची मागणी जोर धरत असल्याने, अखेर आज मंदिरे सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली.
जिल्ह्यातील धार्मिक स्थळे आजपासून दर्शनासाठी खुले
नगर जिल्ह्यात शिर्डी येथील प्रसिद्ध असलेले साईबाबा मंदिर त्याचबरोबर शनिशिंगणापूर येथे असलेले शनी मंदिर, पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी मंदिर, मढी येथील कानिफनाथ मंदिर, राशीन-निघोज येथील रेणुका माता मंदिर, त्याचबरोबर मेहेराबाद येथील मेहेर बाबा समाधी मंदिर ही धार्मिक स्थळे आजपासून भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनासोबत जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्यांनी बैठका घेऊन, भक्तांच्या दर्शनासाठीची नियमावली तयार केली आहे. धार्मिक स्थळी प्रवेश केल्यानंतर या नियमावलीचे पालन करणे भक्तांसाठी बंधनकारक असणार आहे.
शासनाच्या निर्णयाचे मराठा शेतकरी महासंघाकडून स्वागत
मराठा महासंघाच्या शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्हा परिषद सदस्य संभाजीराजे दहातोंडे यांनी शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यास विलंब लावल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - मंदिरे उघडली...! भक्तांसह धार्मिक संघटनांमध्ये उत्साह; पण मंदिरावर उपजीविका असणाऱ्यांचा हिरमोड
हेही वाचा - उघडले देवाचे द्वार! पाडव्याच्या मुहूर्तावर उघडली राज्यातील प्रार्थनास्थळे...