ETV Bharat / state

Shani Janmotsav : शिंगणापुरात शनीदेवाचा जन्मोत्सव उत्साहात

शनिशिंगणापुरमध्ये शनि जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमीत्त जनकल्याण महायज्ञ सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 15 भाविकांनी काशीवरून मोटारसायकलवर कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने शनीदेवास जलाभिषेक घालण्यात आला.

Shani Janmotsav
Shani Janmotsav
author img

By

Published : May 30, 2022, 5:22 PM IST

अहमदनगर - श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर येथे आज ( सोमवार ) होत असलेल्या शनि जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमीत्त जनकल्याण महायज्ञ सोहळा व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 15 भाविकांनी काशीवरून मोटारसायकलवर कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने शनीदेवास जलाभिषेक घालण्यात आला. शनी जन्मोत्सवानिमित्त पहाटची महाआरती राकेश कुमार व महेश चंदानी यांच्या हस्ते तर दुपारी बारा वाजता सौरभ बोरा व जयेश शहा यांच्या हस्तेआरती करण्यात आली.

मंगळवारी शनिरत्न पुरस्काराचे वितरण : उद्या मंगळवारी पद्मभुषण आदर्श सरपंच पोपटराव पवार व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते पुणे येथिल व्यावसायीक बी.व्यंकटेश राव यांना शनिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

हेही वाचा - निवृत्ती महाराज इंदोरीकरांचे कार्यक्रम 30 मे पर्यंत रद्द

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.