ETV Bharat / state

अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशीही बाजारपेठेत तुफान गर्दी - amravati live

अमरावतीत आज दुपारी बारा वाजता पासून १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी घेतला आहे. त्यामुळे याची धास्ती घेत अमरावती करांनी आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी अमरावतीच्या इतवारा बाजारपेठेत किराणा, भाजीपाला दूध, फळे आदी जीवनावश्यक वस्तूची खरेदी केल्याचे चित्र आज सकाळपासून पाहायला मिळाले. दरम्यान या गर्दीत मात्र लोकांनी कोरोनाचे संपूर्ण नियमच पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहेत.

amravati live news update
नागरिकांची बाजारपेठेत तुफान गर्दी
author img

By

Published : May 9, 2021, 1:52 PM IST

अमरावती - जिल्ह्यात मागील सात दिवसापासून कोरोनाबाधित रुग्णाची संख्या दररोज एक हजारांहून जास्त वाढत आहेत. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दुपारी बारा वाजता पासून 15 मे पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत तुफान गर्दी केली होती. दरम्यान या गर्दीत मात्र लोकांनी कोरोनाचे संपूर्ण नियमच पायदळी तुडवल्याचे दिसून आले. आता हीच गर्दी रुग्ण वाढीला कारणीभूत ठरू नये, म्हणजे झाले असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे.

नागरिकांची बाजारपेठेत तुफान गर्दी

या लॉकडाऊनमध्ये आठवडाभर जीवनावश्यक वस्तूची सर्व दुकाने ज्या किराणा, फळ विक्रेते, भाजीपाला, दूध, डेअरीसह आदी सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या अमरावतीकरांनी आज पुन्हा सलग दुसऱ्या दिवशी जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली. मागील पंधरा एप्रिल पासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूच्या दुकाना सकाळी 11 वाजेपर्यंत सूट देण्यात आली होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या खरेदीच्या नावाखाली नागरिक प्रचंड गर्दी करत असल्याने कोरोनाचा फैलाव वाढत आहे. त्यामुळे आता राज्यातील अनेक जिल्ह्यात वैद्यकीय सेवा वगळता पूर्ण पणे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. असाच निर्णय अमरावतीच्या जिल्हा प्रशासनाने घेतला असून आज दुपारी बारा वाजता हा लॉकडाऊन लागणार आहे.

जीवनावश्यक सेवा घरपोच देण्याची मुभा -

या लॉकडाऊनमध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. जीवनावश्यक सेवामध्ये मोडला जाणारा किराणा, भाजीपाला, दूध, मास, फळे हे घरपोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी मिळणार पेट्रोल -

शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी आता पेट्रोल पंप चालकांनी फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल देण्याची मुभा दिली आहे.

हेही वाचा - 'प. बंगालमधील रक्तरंजित राज्यक्रांती! मोदी-शहा का हरले?' रोखठोकमधून संजय राऊतांचे परखड विश्लेषण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.