अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील डीके मोरे जनता विद्यालयात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयातील १५४५ विद्यार्थ्यांची एक आकर्षक रचना तयार करून या माध्यमातून 'बेटी बचाव बेटी पढाओ' या घोषवाक्याद्वारे संदेश देण्यात आला.
आज मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न फार गंभीर झाला आहे. प्रत्येकाने मुलीला शिक्षित केले पाहिजे संरक्षण दिले पाहिजे. तसेच प्रत्येकाच्या मनात मुलींविषयी आदरभाव निर्माण व्हावा म्हणून सामाजिक संदेश देण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. 'बेटी बचाव, बेटी पढाव' हा सामाजिक संदेश देण्यासाठी या दिनी ही रचना तयार करण्यात आली. या विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर, सत्यानंद कसाब, पोपट, या शिक्षकांनी ही आगळीवेगळी संकल्पना राबवली.
हेही वाचा - जुनं ते सोनं; 'बीजमाता' राहिबाईंनी शेणामातीतील बियाण्यांवर लावला लेकरासारखा जीव
हेही वाचा - बीजमाता राहीबाई पोपरेंची 'पद्मश्री'नंतर पहिली मुलाखत 'ईटीव्ही' भारतला, पाहा काय म्हणाल्या..