ETV Bharat / state

संगमनेरातील शालेय मुलाचे दहा कोटीच्या खंडणीसाठी अपहरण झाल्याचे उघड; तिघे ताब्यात - ahmednagar police

मुलाचे अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कापड व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीची मागणी केली. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास करत अपहरणकर्त्यांचा माग काढल्याने त्यांनी मुलाला शहराजवळील खेड्यात सोडून दिले.

कटारिया क्लॉथचे संचालक मनोज कटारिया यांचा मुलगा दक्ष
author img

By

Published : Aug 10, 2019, 11:55 AM IST

Updated : Aug 10, 2019, 12:37 PM IST

अहमदनगर- दहा कोटीच्या खंडणीसाठी संगमनेरमधून शाळकरी मुलाचे अपहरण केल्याचे उघड झाले आहे. अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी कापड व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करुन खंडणीची मागणी केली. मात्र, पोलिसांनी वेगाने तपास करत अपहरणकर्त्यांचा माग काढल्याने त्यांनी मुलाला शहराजवळील खेड्यात सोडून दिले. पोलिसांनी याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

घटनेविषयी माहिती सांगताना पोलीस अधिकारी

संगमनेर येथील कटारिया क्लॉथचे संचालक मनोज कटारिया यांचा मुलगा दक्ष (वय-१२ वर्ष) हा ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिकण्यास आहे. सकाळी तो नेहमी प्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर स्कूलबसची वाट पाहत असताना इंडिका कारमधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याला उचलून इंडिकामध्ये टाकत तेथून पलायन केले.

काही वेळानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोन करत अपहरण केल्याचे सांगितले. घाबरलेल्या पालकांनी शाळेत आणि बसचालकाकडे चौकशी केली असता मुलगा शाळेत पोहचला नसल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

अपहरणकर्त्यांनी मेसेजद्वारे कटारीया यांच्याकडे दहा कोटीची खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास सुरू केला. पोलिसांना मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही पुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरू केला. पोलीस संशयितांपर्यंत पोहोचल्याचा सुगावा लागल्याने आरोपींनी मुलाला संगमनेर जवळील सुकेवाडी येथे सोडून दिले.

सुकेवाडी येथे हा मुलगा एका तरुणाला आढळून आल्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने मुलाला ताब्यात घेतले. तसेच याप्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील आणखी काही फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ दहा कोटीच्या खंडणीसाठी संगमनेरातून शालेय मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार समोर आला आहे...मुलाचे अपहरण केल्या नंतर अपहरणकर्त्यांनी कापड व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करून खंडणीची मागणी केली..मात्र पोलिसांनी वेगाने तपास करत अपहरण कर्त्यांचा माग काढल्याने खंडणीखोरांनी मुलाला शहरा जवळील खेड्यात सोडून दिले..पोलिसांनी याप्रकरणी तिघा सशयीताना ताब्यात घेतले आहे....

VO_ संगमनेर येथील कटारिया क्लॉथचे संचालक मनोज कटारिया यांचा मुलगा दक्ष (वय-१२ वर्ष) हा ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये शिकण्यास आहे. सकाळीच तो नेहमी प्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला होता. घरापासून काही अंतरावर स्कूलबसची वाट पाहत असताना इंडिकामधून आलेल्या अपहरणकर्त्यांनी त्याला उचलून इंडिकामध्ये टाकत तेथून पलायन केले..काही वेळानंतर अपहरणकर्त्यांनी मुलाच्या पालकांना फोन करत अपहरण केल्याचे सांगितले...घाबरलेल्या पालकांनी शाळेत आणि बसचालकाकडे चौकशी केली असता मुलगा शाळेत पोहचला नसल्याच उघड झाल..त्या नंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगीतला....

VO_ अपहरणकर्त्यांनी मेसेजद्वारे कटारीया यांच्याकडे दहा कोटीची खंडणीची मागणी केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने तपास सुरु केला..पोलिसांना मिळालेली माहिती आणि सीसीटीव्ही पुटेजच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला..पोलीस संशयीतापर्यंत पोहोचल्याचा सुगावा लागल्याने आरोपींनी मुलाला संगमनेर नजीक सुकेवाडी येथे सोडून दिले..सुकेवाडी येथे हा मुलगा एका तरुणाला आढळून आल्यानंतर त्याने याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी तातडीने मुलाला ताब्यात घेतले तसेच याप्रकरणी तिघा संशयीताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी सुरु केलाय या प्रकरणातील आणखी काही फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे....Body:mh_ahm_shirdi_school students kidnapping_accused arrested_ 10_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_school students kidnapping_accused arrested_ 10_visuals_bite_mh10010
Last Updated : Aug 10, 2019, 12:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.