अहमदनगर- यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या निर्गुण हत्या प्रकरणात सूत्रधार मास्टरमाईंड वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी हैदराबाद मधून जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. हत्येनंतर बोठे तब्बल साडेतीन महिने फरार होता आणि त्याच्या अटकेचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. अखेर त्याला अटक करण्यात आल्याबद्दल रेखा जरे यांच्या कुटुंबाने समाधान व्यक्त करत जिल्हा पोलिसांचे आभार मानले आहे. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे याने पोलिसांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानत बोठेला निश्चित कठोर शिक्षा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
बाळ बोठेच्या अटकेबद्दल रेखा जरे कुटुंबाने व्यक्त केले समाधान पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यांमुळे बोठेला शिक्षा होणारचबाळ बोठे साडेतीन महिने फरार असला तरी पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींकडून अनेक पुरावे गोळा केले आहेत. सर्वात महत्वाचे पुरावे हे तांत्रिक असून ते रेखा जरे तसेच बाळ बोठेच्या घरातून पोलिसांना मिळालेले आहेत. सिडीआर, कॉम्पुटर, लेखी पत्र, पेनड्राइव्ह, व्हाईस रेकॉर्ड असे अनेक पुरावे हे बाळ बोठेच्या विरोधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी गोळा केले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर त्याला न्यायालय निश्चित शिक्षा करेल असा विश्वास रुणाल जरे यांनी व्यक्त केला आहे.
अटकेतल्या बोठे कडून पोलीस शोधणार अजून पुरावेयाबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये, बोठेने रेखा जरे यांच्याकडून आपली बदनामी होऊ शकते या शंकेने ही हत्या घडवून आणल्याची माहिती दिली. अजूनही इतर कारणे पोलीस तपासात स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.
दाढी वाढवून वेषांतर करून राहत होता बाळ बोठेघटनेनंतर आरोपी म्हणून बोठेचे नाव स्पष्ट होताच तो फरार झाला होता. गेले साडेतीन महिने तो विविध ठिकाणी लपत असला तरी जास्त काळ तो हैद्राबाद येथील बिलाल नगर मध्ये लपून होता. मात्र, चार दिवसांपूर्वी त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने चार ते पाच ठिकाणी स्थलांनतर केले, अखेर हैद्राबाद मधील बालाजी नगर भागातील एका हॉटेल मध्ये त्याला आज (शनिवारी) सकाळी अटक करण्यात आली. बोठेला मदत करणारा एका वकिलासह चार जणांना पण पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हत्येनंतर साडेतीन महिने बोठे होता फरार३० नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची पुण्याहून नगरला येताना तेगाव घाटामध्ये गळा चिरून निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. मात्र, हत्या झाल्यापासून बाळ बोठे हा फरार होता. गेले साडेतीन महिने त्यांने पोलिसांना सतत गुंगारा दिला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते, अखेर काल (शुक्रवारी) हैदराबाद मध्ये पोलिसांनी त्याला अटक करण्यात यश आले.
बाळ बोठेला लपन राहण्याससाठी मदत करणाऱ्यांची होणार चौकशी
जवळपास साडेतीन महिने बाळ बोठे कुठे फरार होता. यादरम्यान त्याला लपवून ठेवण्यात आणि त्याला मदत करण्यात कोणाकोणाचा सहभाग आहे यालाही आता महत्त्व येणार आहे. कारण बाळ बोठे याची अनेक राजकीय आणि ईतर अनेक क्षेत्रातील मोठ्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याचं बोलले जाते. त्यामुळे बाळ बोठेला लपवून ठेवण्यात कोणी मदत केली याचाही तपास पोलिसांना घेत आहे. एकूणच रेखा जरे हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना बाळ बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे आरोपींनी पोलीस जबाबात सांगितले आहे. त्यामुळे मास्टरमाइंड असलेला बाळ बोठे यांनी रेखा जरे यांची हत्या का केली, यामागील कोणकोणती कारणे आहेत, आदींचा तपास आता बाळ बोठेच्या अटकेने करता येणार आहे.
बोठेच्या चौकशीनंतर पुरवणी दोषारोपपत्र दाखल होणार
पोलिसांनी बाळ बोठे आणि अटक पाच आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असले तरी आता बाळ बोठेच्या चौकशीतून जे निष्पन्न होईल त्या आधारे पोलीस पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयात दाखल करतील. या प्रकरणात पोलिसांनी अनेक पुरावे गोळा केल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, मास्टरमाइंड असलेला बाळ बोठे हा सातत्याने पोलिसांना चकवा देत लपून होता. अखेर त्याला हैदराबादमधून पोलिसांनी अटक करून नगरमध्ये आणलेले असून, आज जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत.