ETV Bharat / state

सातभाई मर्चंट बँक बुडाली; सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले, उपोषणाचा पवित्रा - AGITATION

सर्वसामान्य जनतेचे अडकलेले पैसे परत मिळावे, या मागणीसाठी आता या पतसंस्थांचे संचालकच उपोषणाला बसले आहेत. सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून सर्वसामान्य जनतेचे अडकलेले पैसे परत मिळावेत हीच अपेक्षा.

सातभाई मर्चंट बँक
author img

By

Published : Jul 23, 2019, 8:00 PM IST

शिर्डी - कोपरगावच्या सातभाई मर्चंट बँकेने पतसंस्थेचे कोट्यावधी रुपये थकवल्याने ठेवीदार पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. याविरोधात पतसंस्थांच्या संचालकांनी सोमवारपासून कोपरगाव निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.

सातभाई मर्चंट बँक बुडाली; सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले, उपोषणाचा पवित्रा

सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या परिसरातील अनेक पतसंस्थांनी आपले पैसे कोपरगावच्या सातभाई मर्चंट बँकेत ठेवले होते. मात्र, बँकेच्या संचालकांनी आपल्या जवळच्या लोकांच्या नावावर लाखो रूपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड केलीच नाही. ही बँक डबघाईला आल्यानंतर या बँकेत ठेवी ठेवलेले सर्वसामान्य ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी आपली पुंजी या बँकेत ठेवली होती. मात्र, संचालकांच्या या भ्रष्टाचारामुळे ठेवी ठेवणाऱया पतसंस्थां आणि सर्वसामान्य नागरिकांना आजवर बँकेचे उंबरठे झिझवावे लागत आहेत.

या बँकेचा ताबा सरकारने घेतला. त्यानंतर एक लाखांच्या आतील ठेवी असणाऱया लोकांना पैसे दिले गेले. मात्र, एक लाखाच्या वर ठेवी असणाऱयांना आजही पैसे दिले गेले नाहीत. बुडालेल्या या बँकेची आजही मोठी मालमत्ता आहे. साधारण 25 कोटी रूपये देणे असले तरी त्यापेक्षा अधिक संस्थेची मालमत्ता असून, जर बँकेचे इतर बँकेत विलीणीकरण झाले किंवा मालमत्ता विक्रीतून देणी दिल्या गेल्या तर, हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR _कोपरगावच्या सातभाई मर्चन्ट बॅन्केने पतसंस्थाचे कोट्यावधी रुपये थकवल्याने ठेवीदार पतसंस्था अडचणीत आल्या आहेत... याविरोधात पतसंस्थांच्या संचालकांनी कालपासून कोपरगाव निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते....

VO_सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या परीसरातील अनेक पतसंस्थांनी आपले पैसे कोपरगावच्या सातभाई मर्चन्ट बॅन्केत ठेवले..मात्र बॅन्केच्या संचालकांनी आपल्या जवळच्या लोकांच्या नावावर लाखो रूपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड केलीच नाही..त्यामुळे हि कोपरगाव मर्चन्ट बॅन्क पंधरा वर्षापुर्वी अवसायनात निघाली..हि बॅन्क अवसायनात निघाल्यानंतर या बॅन्केत ठेवी ठेवलेले सर्वसामान्य ठेवीदार अडचणीत सापडले.. अनेकांनी आपली पुंजी या बॅन्केत ठेवली होती..मात्र संचालकांच्या या भ्रष्टाचारामुळे ठेवी ठेवणा-या पतसंस्थां आणि सर्वसामान्य नागरिकांना आजवर बॅन्केचे उंबरठे झिझवावे लागतायत....

BITE _राजेंद्र वाबळे , उपोषणकर्ते

VO _अवसायनात निघालेल्या या बॅन्केचा ताबा सरकारने घेतला आणी एक लाखाच्या आतील ठेवी असणा-या लोकांना पैसे दिले गेले मात्र एक लाखाच्या पुढे ठेवी असणारांना आजही पैसे दिले गेले नाही..बुडालेल्या या बॅन्केची आजही मोठी स्थावर मालमत्ता आहे .. साधारण 25 कोटी रूपये देणे असले तरी त्यापेक्षा अधिक संस्थेची मालमत्ता असून जर बॅन्केचे इतर बॅन्केत विलीणीकरण झाले किंवा मालमत्ता विक्रीतून देणी दिल्या गेली तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल..मात्र अवसायक याबाबत गंभीर नसल्याच त्यांच्या भुमिकेवरून स्पष्ट होतय....

BITE_रतन त्रिभुवन , सहायक सहकारी निबंधक

VO_सर्वसामान्य जनतेचे अडकलेले पैसे परत मिळावे या मागणीसाठी आता या पतसंस्थांचे संचालकच उपोषणाला बसले आहेत..सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढून सर्वसामान्य जनतेचे अडकलेले पैसे परत द्यावे हिच अपेक्षा....Body:MH_AHM_Shirdi_Bank Loss_23 July_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Bank Loss_23 July_Visuals_Bite_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.