ETV Bharat / state

सरकारच्या 'त्या' निर्णयाला सरपंच परिषदेचा विरोध; शेवगावमध्ये मोर्चा

हा निर्णय म्हणजे एकप्रकारे सरपंचांच्या हक्क, अधिकारावर गदा आहे. गावा-गावात परत अविश्वास ठराव, सदस्य पळवापळवी घोडेबाजार चालू होईल, वांदानी कोर्ट-कचेरी मुळे गावाची निर्माण होत असलेली अस्मिता परत नष्ट होईल, अशी भावना प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी व्यक्त केली.

सरपंच परिषदेचा शेवगावमध्ये मोर्चा
सरपंच परिषदेचा शेवगावमध्ये मोर्चा
author img

By

Published : Jan 30, 2020, 8:48 AM IST

अहमदनगर - महाविकासआघाडी शासनाने सत्तेत आल्यानंतर जनतेतून सरपंच निवड रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य नाही. या निर्णयाला ताबडतोब स्थगिती द्यावी, तसचे परत सरपंचाची निवड जनतेतूनच व्हावी ही प्रमुख मागणी घेऊन बुधवारी सरपंच परिषद मुंबईच्या वतीने शेवगाव तहसील कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता.

सरपंच परिषदेचा शेवगावमध्ये मोर्चा

सरपंच परिषदेच्यावतीने शेवगावमध्ये बुधवारी सकाळी ११ च्या दरम्यान शेवगाव तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला. शहरातील आंबेडकर चौकातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आंबेडकर चौकातून चालत शेवगाव तहसील कार्यालयावर या मोर्चाचा समारोप करण्यात आला. जनतेतून सरपंच निवड रद्द हा निर्णय झाला असून हा निर्णय निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय म्हणजे एकप्रकारे सरपंचांच्या हक्क, अधिकारावर गदा आहे. गावा-गावात परत अविश्वास ठराव, सदस्य पळवापळवी घोडेबाजार चालू होईल, वांदानी कोर्ट-कचेरी मुळे गावाची निर्माण होत असलेली अस्मिता परत नष्ट होईल, अशी भावना प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी व्यक्त केली. लवकरच सरपंचाचे एक-एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून याबद्दल चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, धनंजय बडे, सचिन नेहुल, बापू आव्हाड, महेश अंगरखे, बबन भुसारी, गणेश गायकवाड, बाळकृष्ण गाडे, अण्णा जगधने, रमेश भागवत, विकास भागवत, संजय क्षीरसागर, विष्णू भागवत, जालिंदर काळे, वैभव पुरनाळे, गोरक्षनाथ गीते, राजेंद्र दगडखैर, उमेश भालसिंग शेवगाव तालुका अध्यक्ष बाबासाहेब गोरडेसह इतर सरपंच यावेळी उपस्थित होते. शेजारील पैठण तालुक्यातील काही सरपंच या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयामध्ये हजर होते.

हेही वाचा - 'सरकार स्थापन करून 60 दिवस झाले मात्र, जनहिताचा एकही निर्णय नाही'

'सरपंच परिषदे'च्या वतीने देण्यात आलेले निवेदन शेवगावचे नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी स्वीकारले. सरपंचांच्या भावना लवकरात लवकर राज्य शासनाला कळविण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस प्रशासनाच्या वतीने एस.बी.आंधळे, अशोक लीपने, कैलास राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा - 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एकता कपूर जितेंद्र यांच्यासह साईचरणी

Intro:सरपंच परिषदेच्या शेवगाव मध्ये भव्य मोर्चाBody:सरपंच परिषदेच्या शेवगाव मध्ये भव्य मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी

सरपंच परिषदेच्यावतीने शेवगाव मध्ये आज सकाळी अकराच्या दरम्यान भव्य असा मोर्चा शेवगाव तहसील कार्यालयावर आयोजित करण्यात आला होता,
शहरातील आंबेडकर चौकातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,आंबेडकर चौकातून चालते शेवगाव तहसील कार्यालयावर या मोर्चाचा समारोप करण्यात आला,
महाआघाडी शासनाने जनतेतील सरपंच निवड रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य असून या निर्णयाला ताबडतोब स्थगिती द्यावी व परत सरपंचाची निवड जनतेतूनच व्हावे ही प्रमुख मागणी घेऊन आज सरपंच परिषद मुंबई यांनी शेवगाव तहसील कार्यालयावर हा मोर्चा आयोजित केला होता, जनतेतून सरपंच निवड रद्द हा निर्णय झाला आहे हा निर्णय हा निर्णय अन्यायकारक आहे, हा निर्णय म्हणजे एका प्रकारे सरपंचांच्या हक्क अधिकारावर गदा आहे,गावा गावात परत अविश्वास ठराव सदस्य पळवा पळवी घोडेबाजार चालू होईल, वांदानी कोर्ट कचेरी मुळे गावाची निर्माण होत असलेली अस्मिता परत नष्ट होईल,अशी भावना एवढी दत्ता काकडे यांनी व्यक्त केली, लवकरच सरपंचाची एक एक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून याबद्दल चर्चा करणार असल्याचे यावेळी सांगितले,
यावेळी प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते,धनंजय बडे, सचिन नेहुल,बापू आव्हाड,महेश अंगरखे, बबन भुसारी,गणेश गायकवाड,बाळकृष्ण गाडे,अण्णा जगधने,रमेश भागवत, विकास भागवत,संजय क्षीरसागर,विष्णू भागवत,जालिंदर काळे,वैभव पुरनाळे, गोरक्षनाथ गीते,राजेंद्र दगडखैर,उमेश भालसिंग शेवगाव तालुका अध्यक्ष बाबासाहेब गोरडे,इ सरपंच यावेळी उपस्थित होते शेजारील पैठण तालुक्यातील काही सरपंच या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शेवगाव तहसील कार्यालयामध्ये हजर होते,
सरपंच परिषदेच्या वतीने देण्यात आलेले निवेदन शेवगावचे नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी स्वीकारले, सरपंचांच्या भावना लवकरात लवकर राज्य शासनाला कळविण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले, पोलीस प्रशासनाच्या वतीने एस.बी.आंधळे, अशोक लीपने,कैलास राठोड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता,Conclusion:सरपंच परिषदेच्या शेवगाव मध्ये भव्य मोर्चा
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.