ETV Bharat / state

मी सामान्य जनतेचा उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ - संग्राम जगताप - ncp

मी सामान्य जनतेचा उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केले. नगर दक्षिण लोकसभेची निवडणुक ही एकतर्फी होणार असल्याचेही जगताप म्हणाले.

आमदार संग्राम जगताप
author img

By

Published : Mar 20, 2019, 10:02 PM IST

अहमदनगर - मी सामान्य जनतेचा उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केले. नगर दक्षिण लोकसभेची निवडणुक ही एकतर्फी होणार असल्याचेही जगताप म्हणाले. लोकसभेचे तिकिट जाहीर झाल्यानंतर प्रथमच त्यांच्यांशी ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे यांनी संपर्क साधला त्यावेळी ते बोलत होते.

दक्षिण नगरची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक समजली जात आहेच या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपकडून पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी मिळण्याची शक्याता आहे. त्यामुळे सुजय विरुद्ध संग्राम असा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माझा विजय निश्चित- संग्राम जगताप

दक्षिण भागाचा आमचा परिचय आहे. उपलब्ध असणार आमदार अशी माझी प्रतिमा आहे. मी विकासासाठी कायम प्रयत्न करत असल्याचे संग्राम जगताप म्हणाले.

संग्राम जगताप यांचे वडील अरुण जगताप हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तसेच संग्राम जगताप हे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. शरद पवारांनी पूर्ण राजकीय गणिताचा विचार करून शिवाजी कर्डीलेंचे जावई असलेले संग्राम यांना उमेदवारी घोषित करत विखे गटाला योग्य संदेश दिला आहे. कर्डीले यांनी आपण भाजप उमेदवाराचेच काम करू असे या अगोदरच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही निवडणूक निकाल लागेपर्यंत उत्कंठावर्धक होणार हे मात्र निश्चित.

आमदार संग्राम यांची उमेदवारी घोषित होताच शहरात जल्लोष सुरू झाला आहे. खास करून जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या माळीवाडा भागात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Intro:अहमदनगर- मी सामान्य जनतेच्या उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ.. राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना विश्वास

Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- मी सामान्य जनतेच्या उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ.. राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना विश्वास

अहमदनगर- सुजय विखे यांच्या उमेदवारी वरून राज्यात चर्चेत आलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघटवविखे यांच्या समोर राष्ट्रवादीचा उमेदवार कोण याची उत्कंठा अखेर होळी सणाच्या सांयकाळी पक्षाने आ.संग्राम जगताप या युवा आमदारांचे नाव घोषित करत संपवली. आ.संग्राम यांचे वडील आ.अरुण जगताप हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. तसेच आ. संग्राम हे भाजपाचे आ.शिवाजी कर्डीले यांचे जावई आहेत. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूर्ण राजकीय गणिताचा विचार करून आ.शिवाजी कर्डीले यांचे जावई असलेले आ.संग्राम यांना उमेदवारी घोषित करत विखे गटाला योग्य तो संदेश दिला आहे. आ.कर्डीले यांनी आपण भाजप उमेदवाराचेच काम करू असे या अगोदरच स्पष्ट केले असले तरी जावयाला खासदारकीची उमेदवारी आणि संधी असल्याने एकूणच ही निवडणूक निकाल लागे पर्यंत उत्कंठावर्धक होणार हे निश्चित आहे.
आ.संग्राम यांची उमेदवारी घोषित होताच शहरात एकच जल्लोष सुरू झाला आहे. खास करून जगताप यांचा बालेकिल्ला असलेल्या माळीवाडा भागात जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली..
या पार्श्वभूमीवर ई टीव्ही भारत प्रतिनिधीने आ.संग्राम जगताप यांच्याशी साधलेला थेट संवात..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- मी सामान्य जनतेच्या उमेदवार असल्याने सुजय विखेंचा पराभव अटळ.. राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांना विश्वास
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.