ETV Bharat / state

सरकारी पक्षासोबत आता 'अंनिस'ही इंदोरीकर महाराजांच्या विरोधात आपली बाजू मांडणार

किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील न्यायालयीन प्रकरणात आता अंधश्रद्धा निर्मुलन समिती देखील आपली भुमिका मांडणार आहे. समितीच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरवठा करणाऱ्या रंजना गवांदे यांनी या खटल्यात सहभागी होण्याचा अर्जही दाखल केला आहे.

indurikar maharaj
किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर
author img

By

Published : Aug 20, 2020, 5:19 PM IST

अहमदनगर - प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आज (गुरुवार) संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार न्यायमुर्ती डी. एस. घुमरे यांच्यासमोर आज सरकारी पक्ष हजर झाला. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याच्या पुढील कामकाजासाठी 16 सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे. त्याच बरोबर आता इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मुलन समिती देखील आपली भुमिका मांडणार आहे. या प्रकरणाचा पाठपुरवठा करणाऱ्या अ‌ॅड. रंजना गवांदे या देखील या खटल्यात सहभागी झाल्या आहेत.

प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मुलांच्या जन्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात 26 जून रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी इंदोरीकर महाराजांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापुर्वीच 4 ऑगस्ट रोजी इंदोरीकर महाराजांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्याला जिल्हा न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याने इंदोरीकरांना दिलासा मिळाला.

अ‌ॅड. रंजना गवादे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन : 'त्यांनी' मारलेली हनुमान उडी म्हणजे...सहकाऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा

त्यानुसार, पुढील सुनावणी आज (गुरुवार) दिनांक 20 ऑगस्ट रोजी संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी पक्षाला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार न्यायमुर्ती डी. एस. घुमरे यांच्यासमोर आज (गुरुवार) सरकारी पक्ष हजर झाला असुन न्यायालयाने या खटल्याच्या पुढील कामकाजासाठी 16 सप्टेंबर ही तारीख दिली आहे.

इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील न्यायालयीन प्रकरणात आता अंधश्रद्धा निर्मुलन समिती देखील आपली भुमिका मांडणार आहे. समितीच्या वतीने या प्रकरणाचा पाठपुरवठा करणाऱ्या रंजना गवांदे यांनी या खटल्यात सहभागी होण्याचा अर्जही दाखल केला आहे. आज या खटल्यात काहीच कामकाज झाले नसुन दिनांक 16 स्पटेंबरला पुढील कामकाज होणार आहे. त्यावेळी सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार आहे.

अ‌ॅड. रंजना गवादे अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या अहमदनगर जिल्हाअध्यक्ष आहेत. तसेच, त्यांनी आपण या प्रकरणात साक्षीदार असून अंनिसच्या वतीनेही आम्हाला न्यायालयापुढे आमचे म्हणणे मांडायचे असल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.