अहमदनगर - भाजपाचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आणि एमएसआरडीसी माजी मंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde
) यांनी पुन्हा आपले लक्ष हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गकडे वळवले आहे. येत्या 15 ऑगस्ट पासून नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाचे लोकअर्पण होणार ( Inauguration of Samriddhi Highway ) असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
नागपूर ते मुंबई हा बनवण्यात आलेला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील लोकअर्पण येत्या 15 ऑगस्ट रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मात्र नागपूर वरून शिर्डीला उतरण्यासाठी बनवण्यात आलेल्या इंटरचेंज या रस्त्याचे देखील काम अद्याप सुरू आहे. त्याच बरोबर इंटरचेंज पासुन 5 किलो मीटर मागे गेलो तर अनेक ठिकाणी रस्त्याचे थोडे थोडे काम अद्याप सुरू आहे. तसेच रस्त्याचा आतमधील डिव्हायडर बसवण्याचं काम अद्यापही बाकी असून गोदावरी नदी पुलावरील एक बाजूचा ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. तर दुसऱ्या बाजूच्या ब्रिजचे काम अद्यापही सुरू आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही फक्त घोषणाच ठरणार की प्रत्यक्षात अवतारणार की पुन्हा तारीख पे तारीख या महामार्गाला मिळणार हे बघणारे ठरणार आहे.
हेही वाचा :CM Eknath Shinde : राज्यातील मंदावलेल्या मुख्य प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांना द्यावी लागणार गती!