ETV Bharat / state

भाविकांसाठी आनंदाची बातमी! साई संस्थानच्या वतीने बुंदीच्या लाडू पाकीटांची विक्री सुरू - shirdi breaking news

भाविकांच्या मागणीनुसार साईबाबा संस्थानच्या वतीने आज पासुन पुन्हा बुंदीच्या लाडू पाकीटांची विक्री सुरू करण्यात आली

साई संस्थानच्या वतीने बुंदीच्या लाडू पाकीटांची विक्री सुरू

author img

By

Published : Mar 23, 2021, 5:16 PM IST

शिर्डी - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. तसेच भाविकांना दिला जाणारा बुंदीच्या लाडूचा प्रसादही बंद करण्यात आला होता. हा लाडू प्रसाद पुन्हा सुरू करण्याची मागणी भाविकांनाकडून केल्या जात असल्याने भाविकांच्या मागणीनुसार साईबाबा संस्थानच्या वतीने आज पासुन पुन्हा बुंदीच्या लाडू पाकीटांची विक्री सुरू करण्यात आली. गेट नंबर 4 व हनुमान मंदिराशेजारील साई कॉम्‍प्‍लॅक्‍स येथे लाडू विक्री काऊंटर सुरु करण्‍यात आली, अशी माहिती माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.

प्रसाद स्‍वरुपात विक्री-

साईबाबा संस्‍थानच्‍या मार्फत सन 1990 पासुन शिर्डीत येथे येणारे साईभक्‍तांना तिरुपती देवस्थानाच्‍या धर्तीवर साजुक तुपातील व खिसमीस, काजू, बदाम, विलायची आदिंचा समावेश करुन बुंदीच्‍या लाडूची प्रसाद स्‍वरुपात विक्री केली जाते. जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करुन दिनांक 17 मार्च 2020 पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद करण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे लाडू प्रसाद पाकीट विक्री पुर्णत: बंद करण्‍यात आली होती.

भाविकांसाठी आनंदाची बातमी! साई संस्थानच्या वतीने बुंदीच्या लाडू पाकीटांची विक्री सुरू
दिनांक 14 नोव्‍हेंबर 2020 रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक 16 नोव्‍हेंबर पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. तसेच कोव्‍हीड-19 चे संदर्भीत सर्व नियमांचे पालन करून लाडू प्रसाद उत्‍पादन पुन:श्‍च प्रायोगिक तत्‍वावर सुरू करण्‍यात आले. 6 मार्च 2021 रोजी पासुन साईबाबांचा दर्शनासाठी येणाऱ्या भक्‍तांना दर्शन झाल्यानंतर दर्शन रांगेत अंदाजे 50 ग्रॅम वजनाचा 1 बुंदी लाडू प्रसाद रूपाने पाकिटातून विनामुल्‍य वाटप करण्‍यात येत आहे.

25 रुपये प्रमाणे विक्री-

त्‍यानुसार साईभक्‍तांकडून मागणी होत असल्‍याप्रमाणे दिनांक 22 मार्च पासुन लाडू प्रसाद विक्री सुरु करण्‍यात आली आहे. 3 लाडू असलेल्‍या पाकीटांकरीता ना नफा ना तोटा या तत्‍वावर 25 रुपये प्रमाणे विक्री केली जात आहे. सदरचे लाडू विक्री काऊंटर हे गेट नंबर 4 व हनुमान मंदिराशेजारील साई कॉम्‍प्‍लेक्‍स येथे उपलब्‍ध करण्यात आले आहे.

हा लाडू अत्‍यंत शास्‍त्रोक्‍त पध्‍दतीने करण्‍यात येत असून त्‍याचा वापर भक्‍तांनी प्रसाद म्‍हणुन त्‍वरीत सेवन करावा. त्‍याचा वापर 24 तासाचे आत करण्‍यात यावा. बुंदी लाडू प्रसाद हा सुधारीत पद्धतीने तयार करण्‍यात आलेला असुन भक्‍तांना त्‍याची प्रदीर्घ काळापासून प्रतिक्षा व मागणी देखील होती.

हेही वाचा- एक एप्रिलपासून ४५ वर्षांवरील व्यक्तींना घेता येणार कोरोना लस; प्रकाश जावडेकरांची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.