अहमदनगर Sai Sansthan on Devotees Fraud : साईबाबांच्या आरती व दर्शन पासेसमध्ये होणारा गैरकारभार रोखण्यासाठी साईंच्या आरतीची सशुल्क पासेससाठी शिफारस करताना यापुढे सर्व भाविकांना आधार कार्ड व मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे. पासेस कन्फरमेशनबाबत संबधित भाविकाच्या मोबाईलवर मेसेज पाठवला जाणार आहे. येत्या शुक्रवारपासून प्रायोगिक तत्वावर याची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी दिलीय.
संस्थानचा टॅग : साईमंदिर परिसरात तसंच साई संस्थानच्या रुग्णालयात भाविक रक्तदान करतात. भाविकांनी दान केलेलं रक्त हे गरजूंना विकत देण्याऐवजी मोफत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय साईबाबा संस्थाननं घेतलाय. साई मंदिर परीसरात काही बाहेरील रक्तपेढ्यांमार्फतही रक्तसंकलन केल जातं. त्यांनाही हे रक्त मोफतच देण्याची सक्ती केली जाणार आहे. याबाबत संस्थानकडून संबधित रुग्णांशी संपर्क करत मोफत रक्त दिलं गेलं की नाही, याची खात्रीही केली जाणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल व नॉट फॉर सेल लिहिलेलं असेल, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर यांनी दिलीय.
शिर्डी सारखेच मंदिर उभारणार : साईंच्या शिकवणुकीच्या प्रचार प्रसारासाठी साई संस्थाननं देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतलाय. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे साई संस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आणि व्यवस्थापन करणार. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान हे उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्यानं उभारण्यात येणाऱ्या मंदिरांनाही पन्नास लाखांपर्यंत मदत करण्याचा संस्थान विचार करत आहे. याच बरोबर देशभरातील साई मंदिराची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही साईसंस्थानचा विचार सुरू आहे. ही योजना अमलात आणण्यापूर्वी साईभक्त आणि ग्रामस्थांचीही मते विचारता घेतली जाणार असल्याचं साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवा शंकर म्हणाले.
युनीक आयडी कार्ड : साईंबाबांना भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील, त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक आरत्या व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संस्थान युनीक आयडी कार्ड बनणार आहे. यापुर्वी साई समाधीवर शॉल अर्पण करण्यासाठी सोडत पद्धत अवलबंण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत संस्थान विचार करत आहे.
हेही वाचा :