शिर्डी (अहमदनगर) - नाताळची सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देत नविन वर्षाच्या स्वागता निम्मीताने शिर्डीत होणारी गर्दी लक्षात घेता साई भक्तांनी केवळ ऑनलाइन पध्दतीने बुकींग करुनच शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी यावे, असे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात आले आहे.
दिवसभरातून केवळ 12 हजार भक्तांनाच घेता येणार दर्शन
साईबाबाच्या दर्शनासाठी तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीमध्ये साईभक्तांची दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, यावर्षी कोरोनामुळे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे भक्तांनी अचानक शिर्डीत गर्दी न करता साई संस्थानच्या वेबसाईटवरुन ऑनलाइन पध्दतीनेच बुकींग करुन यायचे आहे. सध्या दिवसभरात केवळ 12 हजार भाविकांनाच दर्शन देता येणार आहे. त्यातील चार हजार भक्तांना शुल्क आकारुन दर्शन पासेस पाच दिवसांपूर्वी मिळू शकतील. उर्वरीत आठ हजार भाविकांना मोफत दर्शन पासेस तेही केवळ दोन दिवसांपूर्वी आरक्षित करता येणार आहे. तुम्ही शिर्डीला येऊन दर्शनाचा पास घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला कोटा शिल्लक असेल तरच मिळेल अन्यथा मिळणार नसल्याचे साई संस्थानकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रमापेक्षा जास्त गर्दी झाली तर दर्शन रागां बंद करण्याची शक्यता
साईभक्तांनी दर्शन पास घेऊन, तारीख व वेळ निश्चित करूनच शिर्डीकडे प्रयाण करावे तसेच शिर्डीत विनाकारण गर्दी करण्याचे टाळावे शिर्डीत प्रमाणापेक्षा अधिक गर्दी झाली तर दर्शन रांगाही बंद करण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे साई संस्थानकडून सांगण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून 31 डिसेंबरला शिर्डीत मोठी गर्दी होते. यामुळे 31 डिसेंबरला रात्रभर साईमंदीर खुले ठेवले जात होते. मात्र, यंदाच्या वर्षी ते खुले राहील की बंद याबाबत अद्याप साई संस्थानकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
हेही वाचा - आमदार निलेश लंकेच्या बिनविरोध ग्रांमपंचायत निवडणूक संकल्पनेला अण्णांचा पाठिंबा
हेही वाचा - ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् आमदार निधीचे पंचवीस लाख मिळवा..!!