ETV Bharat / state

साई संस्थानाच्या बैठकीला विश्वस्थांनी फिरवली पाट

शिर्डी संस्थानाने मदतीचा पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदत निधीचा चेक मुख्यमंत्र्यांना दिला. मात्र या कार्यावेळी संस्थान अध्यक्षांनी विश्वस्तांना सोबत घेतले नाही. त्यामुळे साई संस्थानच्या विश्वस्तांनी आज व्यवस्थापनाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली.

साई संस्थानच्या बैठकीला विश्वस्थांनी फिरवली पाट
author img

By

Published : Aug 22, 2019, 6:38 PM IST

शिर्डी - सांगली, कोल्हापूर येथे महापुराने कहर केला होता. पुरामुळे तेथील नागरिकांचे हाल झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मदतील राज्यातील प्रत्येक स्तरातून मदतीचे हात सरसावले आहेत. याचप्रमाणे शिर्डी संस्थानाने देखील मदतीचा पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदत निधीचा चेक मुख्यमंत्र्यांना दिला. मात्र या कार्यावेळी संस्थान अध्यक्षांनी विश्वस्तांना सोबत घेतले नाही. त्यामुळे साई संस्थानच्या विश्वस्तांनी आज व्यवस्थापनाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली.

या प्रकरणाबाबत माहिती देताना शिर्डी साई संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे

मात्र, याबाबत संस्थानाच्या विश्वस्तांनी दुजोरा दिला नसला तरी नगराध्यक्षा वगळता कुणीही बैठकीकडे फिरकले नाही. त्यामुळे संस्थानाचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे आणि विश्वस्त असलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते या दोघांनाच आजची बैठक घ्यावी लागली. मात्र दुपारी दोन वाजता सुरू होणारी बैठक तब्बल दीड तास उशिराने सुरू झाली.

डॉ. सुरेश हावरे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दहा कोटींचा चेक मुख्यमंत्री निधीसाठी दिला होता. हा चेक त्यांनी १६ ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यातील कुणीही उपस्थीत नव्हते. त्यामुळे गेल्या दोन-तीन दिवसापूर्वी झालेल्या विश्वस्तांच्या उपसमितीच्या बैठकीत व नंतरही संस्थान परिसरात दबक्या आवाजात याबाबत चर्चा सुरू होती. किमान आपल्याला याबाबत कळवायला हवे होते, अशी विश्वस्तांची अपेक्षा होती.

विश्वस्तांनी मात्र बहिष्कार घातल्याचा नकार दिला

याबाबत विश्वस्तांनी मात्र बहिष्कार घातल्याचा नकार दिला. विश्वस्त अ‍ॅड. मोहन जयकर, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपण कामानिमित्त दिल्लीत असल्याने बैठकीला आलो नसल्याचे सांगितले. बिपीन कोल्हे यांचा संपर्कच होवू शकला नाही. तर राजेंद्र सिंह यांनी बैठकीला येणार नसल्याचे अगोदरच कळवले होते. मात्र नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी व्यवस्थापनाच्या बैठकीला उपस्थिती लावली होती.

१७ विश्वस्तांच्या व्यवस्थापनातून शासनाने बऱ्याच जणांची नियुक्ती केले होती. त्यातील शिवसेनेचे तीनल विश्वस्त आलेच नाहीत, तर अन्य तिघांनी वेगवेगळ्या कारणाने राजीनामे दिले होते. सध्या सहाच विश्वस्त काम पहात आहेत. यावेळी अर्चना कोते यांनी शिर्डी व पदसिद्ध विश्वस्त साईसंस्थान शहराच्या विकासाचे अनेक विषय संस्थानकडे असल्याने आपण बैठकीला आलो आहोत. मात्र बहिष्काराबाबत माहिती नसल्याची त्यांनी कबुली दिली आहे.

विश्वस्तांनी आपल्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्या असत्या तर त्यांचा गैरसमज दुर केला असता

याबाबत साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष, डॉ. सुरेश हावरे म्हणाले की, पूरस्थिती गंभीर असल्याने सर्व विश्वस्तांशी फोनवरून चर्चा करून ११ ऑगस्टला निधी जाहीर केला. पुढच्या तीन दिवसात तातडीने उच्च न्यायालयाची व शासनाची मान्यता घेवून चेक तयार करण्यात आला. न्यायालयाने १७ ऑगस्टच्या आत मदत देण्याचे निर्देश दिले होते. त्यातच १५ व १७ ऑगस्टला सुट्टी होती त्यामुळे मदतीचे महत्व लक्षात घेवून व मुख्यमंत्र्यांची मिळेल तशी वेळ घेवून चेक त्यांच्याकडे सोपविण्यात आला. विश्वस्तांनी याबाबत त्यांची भावना माझ्याकडे व्यक्त केली असती तर त्यांचा गैरसमज दुर केला असता असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ सांगली कोल्हापुर पुरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदत निधीचा चेक मुख्यमंत्र्यांना देतांना संस्थान अध्यक्षांनी सोबत घेतले नाही़ यामुळे साई संस्थानच्या विश्वस्तांनी आज व्यवस्थापनाच्या बैठकीवर बहिष्कार टाकून आपली नाराजी व्यक्त केली़य....

VO_साई संस्थानच्या विश्वस्तांनी याला दुजोरा दिला नसला तरी नगराध्यक्षा वगळता कुणीही बैठकीकडे फिरकले नाही़ यामुळे संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे व विश्वस्त असलेल्या शिर्डीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते या दोघांनाच आजची बैठक घ्यावी लागली़ दुपारी दोन वाजता सुरू होणारी बैठक तब्बल दिड तास उशीराने सुरू झाली़....पुरग्रस्तांसाठीच्या मदतीचा दहा कोटींचा चेक मुख्यमंत्री निधीसाठी संस्थानचे अध्यक्ष डॉ़ सुरेश हावरे यांनी १६ ऑगस्टला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त केला़ यावेळी विश्वस्त व मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यातील कुणीही उपस्थीत नव्हते़ त्यामुळे गेले दोन-तीन दिवसापुर्वी झालेल्या विश्वस्तांच्या उपसमितीच्या बैठकीत व नंतरही संस्थान परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरू होती़ किमान आपल्याला याबाबत कळवायला हव होत अशी विश्वस्तांची अपेक्षा होती़....

VO_ विश्वस्तांनी मात्र बहिष्कार घातल्याचा इन्कार केला़ विश्वस्त अ‍ॅड़ मोहन जयकर, माजी खासदार भाऊऊसाहेब वाकचौरे यांनी आपण कामा निमीत्त दिल्लीत असल्याने बैठकीला आलो नसल्याचे सांगितले़ बिपीन कोल्हे यांचा संपर्कच होवू शकला नाही़ राजेंद्र सिंह यांनी मात्र बैठकीला येणार नसल्याचे अगोदरच कळवले होते़ नगराध्यक्षा अर्चना कोते यांनी मात्र व्यवस्थापनाच्या बैठकीला उपस्थीती लावली़..सतरा विश्वस्तांच्या व्यवस्थापनात शासनाने बाराच नियुक्त केले़ त्यातील शिवसेनेचे तीन आलेच नाहीत तर अन्य तिघांनी वेगवेगळ्या कारणाने राजीनामे दिले़ सध्या सहाच विश्वस्त काम पहात आहेत़...अर्चना कोते, नगराध्यक्षा, शिर्डी व पदसिद्ध विश्वस्त साईसंस्थान-शहराच्या विकासाचे अनेक विषय संस्थानकडे असल्याने आपण बैठकीला आलो आहोत़ बहिष्काराबाबत माहिती नसल्याची काबुली दिली आहे...

VO_ डॉ़ सुरेश हावरे, अध्यक्ष, साईबाबा संस्थान-पुरस्थीती गंभीर असल्याने सर्व विश्वस्तांशी फोनवरून चर्चा करून ११ ऑगस्टला निधी जाहीर केला़ पुढच्या तीन दिवसात तातडीने उच्च न्यायालयाची व शासनाची मान्यता घेवुन चेक तयार करण्यात आला़ न्यायालयाने १७ ऑगस्टच्या आत मदत देण्याचे निर्देश दिले होते़ त्यातच १५ व १७ ऑगस्टला सुट्टी होती़ मदतीची तातडी लक्षात घेवुन व मुख्यमंत्र्यांची मिळेल तशी वेळ घेवुन चेक त्यांच्याकडे सोपवला़ विश्वस्तांनी त्यांची भावना माझ्याकडे व्यक्त केली असती तर त्यांचा गैरसमज दुर केला असता....Body:mh_ahm_shirdi_sai trust miting_22_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sai trust miting_22_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.