शिर्डी - दिवाळीच्या आणि शनिवार रविवारचा सुट्या निमित्त्याने भाविकांनी शिर्डीत साई दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. साई संस्थानकडुन ऑनलाईन पासेस असणाऱ्या केवळ पंधरा हजार भाविकांनी दर्शनसाठी सोडण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन पासेसच निघत नसल्याने भाविकांना कळसाच दर्शन घेवुनच माघारी परतावे लागत आहे.
केवळ ऑनलाईन पासेस असणाऱ्यांनाच दर्शन -
कोरोनामुळे साई मंदिर बंद आणि अनेक निर्बंध असल्याने भाविकांना साई दर्शनापासून गेल्या अनेक दिवासापासून वंचित राहावा लागले होते. आता भाविकांना साई दर्शनासाठी मंदिर खुले झाल्यानंतर दिवाळी आणि शनिवार रविवारची सुट्टी असल्याने आज शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मात्र कोरोनाच्या नियमांनामुळे केवळ ऑनलाईन पासेस असणाऱ्यांनाच दर्शनासाठी सोडले जात आहे.
साई मंदिर कळसाचे दर्शन घेऊन भाविक परतले -
साईबाबांचा दर्शनासाठी येत्यावेळी अनेक भाविक शिर्डीला येण्याआधीच ऑनलाइन दर्शन पास बुकिंग करून येतात तर अनेक भाविक शिर्डीत येवुन साई दर्शन पासेस काढतात. मात्र आज अनेक भाविकांनी शिर्डीत येऊन पास काढण्याचा प्रयत्न केला असता साई संस्थानची वेबसाईट स्लो असल्याने पास व्हेरीफाकेशनचा मेसेजच मिळत नसल्याने पासेस मिळण्यात अडचणी येत आहेत. यामुळे आज अनेक भाविकांना साई दर्शनापासून वंचित राहावा लागले असून साई मंदिर कळसाचे दर्शन घेऊन भाविकांना परतीचा प्रवास करावा लागला आहे.
ऑफलाईन पासेसही सुरु करण्याची मागणी -
शिर्डीत दररोज पंधरा हजार भाविकांनाच ऑनलाईन पासेस देवुन दर्शन दिल जात आहे. त्यात दहा हजार मोफत तर पाच हजार लोकांना सशुल्क पासेस दिले जात आहे. त्यात पासेस काढण्यासाठी आधीच अनेक अडचणी येतात त्यात आज गर्दी झाल्याने ती सिस्टमच स्लो झाल्याने भाविकांना अनेक अडचणींना सामोरी जावे लागत आहे. अनेक भाविकांना तर पासेसच मिळाले नाहीत त्यामुळे भाविकांची ही अडचण दुर करण्यासाठी ऑफलाईन पासेसही लगेच सुरु करण्याची मागणी शिर्डी ग्रामस्थ रविंद्र गोंदकर यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी -
शिर्डीत येणाऱ्या भाविकांच्या सुविधेला प्राधान्य असल्याच साई संस्थानकडून सांगण्यात येत. ऑफलाईन पासेस देण्यासाठीची परवानगी नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली आहे. मात्र सरकारी कारभारामुळे आज मात्र भाविकांना साई दर्शनापासून वंचित राहावे लागत आहे.
हेही वाचा - नगरमध्ये रुग्णालयाला आग; जाणून घ्या यापूर्वी कुठे कुठे घडल्या होत्या अशा घटना...