शिर्डी - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू करण्यात आला. या काळात देशभरातील सर्वच धार्मिक तीर्थस्थळे दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. त्यानंतर चौथ्या लॉकडाऊन पासून काही नियम शिथील करत व्यावसाय उद्योग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. तसेच अनलॉक १ मध्ये आजपासून(८ जून) देशातील महत्वाची मंदिरे सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्राच्या आदेशानुसार शिर्डीचे साईमंदिरही दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी भाविकांमधून होऊ लागली आहे. मात्र, राज्य शासनाच्या निर्णयानंतरच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
देशातील महत्वाची मंदिरे दर्शनासाठी खुली.. शिर्डीला प्रतीक्षा राज्य सरकारच्या आदेशाची - साईबाबा मंदिर न्यूज
देशातील सर्वात मोठे देवस्थान म्हणून ओळखले जाणारे तिरूपती बालाजी मंदिर आज स्थानिक भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. मात्र, राज्यसरकारकडून साई संस्थानला मंदिर सुरू करण्याबाबत कोणताही आदेश मिळाला नाही. त्यामुळे राज्य सरकारचे निर्देश आल्यानंतरच साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थांनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.