ETV Bharat / state

साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला आजपासून सुरुवात - साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात

शिर्डीतील साईबाबांच्या यंदाच्या पुण्‍यतिथी उत्सवास सुरुवात झाली आहे. उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी गुरुवारी (दि. 14) पहाटे साडेचार वाजता साईबाबांची काकड झाली. त्यानंतर साईबाबा मंदीरातून साईंच्या फोटोची आणि पोथीची मिरवणुकीने द्वारकामाईत गेली त्यानंतर नंतर तेथे साईचरीत्राच्या अखंड पारायणास सुरुवात झाली आहे.

b
b
author img

By

Published : Oct 14, 2021, 12:54 PM IST

अहमदनगर - शिर्डीतील साईबाबांच्या यंदाच्या पुण्‍यतिथी उत्सवास सुरुवात झाली आहे. उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी गुरुवारी (दि. 14) पहाटे साडेचार वाजता साईबाबांची काकड झाली. त्यानंतर साईबाबा मंदीरातून साईंच्या फोटोची आणि पोथीची मिरवणुकीने द्वारकामाईत गेली त्यानंतर नंतर तेथे साईचरीत्राच्या अखंड पारायणास सुरुवात झाली आहे.

बोलताना साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी

शिर्डीत साईबाबांनी साठ वर्षांहून अधिक काळ वास्तव्य केल्यानंतर त्यांचे 15 ऑक्टोबर, 1918 रोजी महानिर्वाण झाले. त्यानंतर शिर्डीत दसऱ्याला साईबाबांचा पुण्यतीथी उत्सव साजरा केला जाऊ लागला. यास या वर्षी 103 वर्षे पुर्ण होत आहेत. यावर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे साध्या पद्धतीने पुण्यतीथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज साईबाबांच्या साईचरीत्राची आणि फोटोची मिरवणूक साई मंदीरातून द्वारकामाई मंदीरापर्यंत काढण्यात आली होती. या साईचरीत्र ग्रंथ कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी तर विणा उप कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेतली होती. ही मिरवणुक द्वराकामाईत पोहचल्यानंतर येथे साईचरीत्राच्या पहिल्या अध्यायाचे वाचन करत अखंड वाचणास सुरुवात झाली आहे. आज (दि. 14) दुपारी साडेबारा वाजता माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी चार ते सहा यावेळेत कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिरातील स्‍टेजवर होणार आहे. सायंकाळी सवासहा वाजता धुपारती होईल. रात्री साडेदहा वाजता श्रींची शेजारती होणार आहे. त्‍यानंतर समाधी मंदिर बंद केले जाईल. पण, श्री साईसच्‍चरित अखंड पारायण द्वारकामाई मंदिरात रात्रभर चालू राहणार आहे.

हेही वाचा - साईबाबा पुण्यतिथी उत्सव : विद्युत रोषणाईने मंदिर अन् परिसर उजळला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.