अहमदनगर- भाजपच्या स्वतःच्या सर्व्हेत त्यांचे पाच ते सहा उमेदवार अडचणीत असल्याची बातमी आहे. आणि त्यात एक राम शिंदेंची पण जागा आहे. त्यामुळे रोहित पवार यांचा विजय पक्का असल्याचे भाजपचाच सर्व्हे सांगत आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना खासदार सुळे यांनी रोहितचा विजय नक्की असल्याचा दाखला दिला. हे आपण नाही तर एका बातमीत आलेल्या भाजपचा सर्व्हे म्हणतो आहे, असे सांगत भाजपचे पाच ते सहा मंत्री असलेले उमेदवार अडचणीत आहेत. आणि त्यात रोहित यांच्या विरोधात उभे असलेले राम शिंदे यांचे देखील नाव असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. एका आईला माहीत असते की आपला मुलगा पास होणार की नापास. त्यामुळे राम शिंदे यांची आई म्हणजे भाजप आहे आणि त्यात ते नापास होत असल्याचे म्हणत असतील तर आता रोहितला राहिलेल्या दिवसात प्रचार करायची गरजच नसल्याचा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा- २ वर्षानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्याचं ठिकाण येरवडा जेल असेल - सुजय विखे
सभेला राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवतीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यावेळी उपस्थित होत्या.
हेही वाचा- 'राज्यात ७० हजार जागांची भरती करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्षात त्यांच्याच पक्षात केली मेगाभरती'