ETV Bharat / state

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी घेतला कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा म्हणाले ....

कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यात संचारबंदीमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र आता नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहून करण्याचे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

saheb
आढावा घेताना मंत्री बाळासाहेब थोरात
author img

By

Published : May 15, 2020, 7:05 PM IST

अहमदनगर - कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. त्याचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. तसेच सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे गरजेचे असल्याचे अवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या प्रांगणात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संगमनेर शहर, धांदरफळ, कुरण, घुलेवाडीसह तालुक्यातील सर्व गावांचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला.

यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, प्रांताधिकारी शशिकांत मंगळुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, सुनिल पाटील, पी. वाय. कादरी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदी बैठकीत उपस्थित होते.

संगमनेर शहरातील हॉटस्पॉट तसेच धांदरफळ बु., कुरण, घुलेवाडी येथील परिस्थिती व प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. तसेच संगमनेर शहर व तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी प्रशासनाला महत्वाच्या सूचना केल्या.

याप्रसंगी थोरात म्हणाले, की कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. मागील दोन महिन्यात संचारबंदीमुळे त्याची वाढ रोखण्यात यश आले आहे. मात्र, आता नागरिकांनी शासनाने लागू केलेल्या नियमांसह स्वयंशिस्त पाळणे महत्वाचे आहे. कोरोनाचा मुकाबला आपण सतर्क राहुन करु या. नागरिकांच्या सुरक्षितेला सर्वोच्च प्राधान्य देवून प्रशासनाने काही कडक नियम केले आहेत. नागरिकांनी त्याचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. कोरोना संकटात महसूल, पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसह अनेक विभागांचे कर्मचारी व पदाधिकारी, स्वयंसेवक चांगले काम करत आहेत.

या काळात तालुक्यातील नागरिकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत गरिब, रोजंदारीवरील मजूर व परप्रांतीय कामगारांना मानवतेच्या भावनेतून चांगले सहकार्य केले आहे. हे काम कौतुकास्पद आहे. आपण राज्यपातळीवर काम करताना मदत कक्षातून परप्रांतीय मजूर, गोरगरिब यांच्यासाठी सातत्याने काम करत असून दररोज जिल्हानिहाय मदतकार्याचा आढावा घेत आहे. नागरिकांच्या मिळालेल्या सहकार्यातून अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त पाळावी. धांदरफळ, कुरण, संगमनेर शहर व हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणातील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.