ETV Bharat / state

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे-औषधे वेळेवर अन् मुबलक द्या, मंत्री थोरात यांनी दिल्या सूचना - संगमनेर बातमी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मजूर स्थलांतर करणार नाहीत यासाठी गावातच काम उपलब्ध करून देताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त फळबागा लागवड कामाचे नियोजन कृषी विभागाने करावे. तसेच सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयाबीन बी पुरवता येईल यासाठी जागरूक असावे, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.

बैठकीवेळचे छायाचित्र
बैठकीवेळचे छायाचित्र
author img

By

Published : May 11, 2021, 7:59 PM IST

अहमदनगर - संपूर्ण देशात सध्या कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगले काम करत असून येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सर्व शेतकरी बांधवांना सर्व बी-बियाणे, रासायनीक खते, औषधे हे वेळेवर व मुबलक देण्यासाठी कृषी विभागाने तयार असावे, अशा सूचना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन बैठकीवीळी मंत्री थोरात म्हणाले की, चालू हंगाम हा कोरोणाच्या संकटामुळे आव्हानात्मक आहे. शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे. तालुक्यात कुठेही तुटवडा होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गेल्या दोन-तीन वर्षांपासून ज्या बियाणांची मागणी जास्त आहे त्या वानांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्या बियाण्यांची उपलब्धता मुबलक करावी. कृषी निविष्ठा तक्रार निवारण केंद्र स्थापन करावे. भरारी पथकाने आपले काम सुरू करावे. तसेच तालुक्यातील वातावरण फळबागा व भाजीपाल्यासाठी चांगले असल्याने या पिकांखालील क्षेत्र वाढवण्यावर कृषी विभागाने भर द्यावा, असे ते म्हणाले.

याच बरोबर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मजूर स्थलांतर करणार नाहीत यासाठी गावातच काम उपलब्ध करून देताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत जास्तीत जास्त फळबागा लागवड कामाचे नियोजन कृषी विभागाने करावे. तसेच सोयाबीन पिकाखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सोयाबीन बी पुरवता येईल यासाठी जागरूक असावे, असेही म्हणाले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, डाळींब, कांदा, टोमॅटो ही तालुक्यातील आजची व्यवस्था मजबूत करणारे पिके असून कृषी विभागाने त्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून कृषी विद्यापीठाच्या मदतीने शेतकऱ्यांना चांगले बियाणे व मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्नशील असावे. एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल शेतकरी वर्गामध्ये रुजवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यात डाळींब या पिकाची मोठी उत्पादन होत असून ते इतर तालुक्यांसाठी मार्गदर्शक आहे. तसेच शेततळ्याच्या माध्यमातून मोठे क्षेत्र लागवडीखाली आले आहेत. शेततळ्याच्या संगमनेर पॅटर्न झाले असल्याचे ते म्हणाले.

या बैठकीचे प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोळे यांनी केले तर सूत्रसंचालन तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी केले. यावेळी ऑनलाइन पद्धतीने अनेक शेतकरी व पदाधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते.

हेही वाचा - युवक काँग्रेसच्या पुढाकारामुळे राज्यभरातील अनेक खासगी रुग्णालयात बिल कमी.. रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.